
ठाणे : वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी घोडबंदर मार्गावर विविध प्रकारची कामे सुरू आहेत. घोडबंदर आणि भिवंडी मार्गावर मेट्रोचे जाळे पसरवले जात आहे; मात्र मेट्रो रेल्वेसाठी कापूरबावडी नाका येथे रस्त्यात उभे केलेले मेट्रोचे पिलर वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. हे पिलर उभे करताना नियोजन चुकल्याने त्याचा फटका घोडबंदर, भिवंडी, नाशिक आणि मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना बसत आहे. भविष्यातही कोंडीत मोठी भर पडणार असून, हे ठिकाण कोंडी करणारे ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.