esakal | अखेर पत्रीपुलाच्या गर्डर टाकण्याच्या कामाला सुरवात, लवकरच पूल नागरिकांसाठी खुला होणार
sakal

बोलून बातमी शोधा

अखेर पत्रीपुलाच्या गर्डर टाकण्याच्या कामाला सुरवात, लवकरच पूल नागरिकांसाठी खुला होणार

पत्रीपुलाच्या कामाच्या वेळी शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिकांनी शक्ती प्रदर्शन केले. आदित्य ठाकरे यांनी मंडपामध्ये येतात गर्दी पाहून दूर सर्वांना सोशल डिस्टंसिंग पाळण्याच्या सूचना दिल्या .

अखेर पत्रीपुलाच्या गर्डर टाकण्याच्या कामाला सुरवात, लवकरच पूल नागरिकांसाठी खुला होणार

sakal_logo
By
रवींद्र खरात

कल्याण डोंबिवलीकरांसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा पत्रीपुलाचं अनेक दिवस रखडलेलं काम आजपासून सुरु झाले आहे. गर्डर बसवण्यासाठी मध्य रेल्वेने आज सकाळी ९.५० मिनिटांपासून दुपारी २ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतलाय. दरम्यान दोन आठवड्यांमध्ये चार दिवसांच्या मेगाब्लॉकनंतर पत्रीपुलाच्या कामाला  खऱ्या अर्थाने गती मिळणार आहे. आज शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी पत्रीपुलाच्या गर्डर टाकण्याच्या सुरु असलेल्या कामाची पाहणी केली. 

पत्रीपुल हा नक्कीच मोठा प्रश्न आहे, रस्ते विकास महामंडळ हे खाते एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याने या कामांना वेग आला आहे. अशी विकास कामे राज्यात महाविकास आघाडीच्यावतीने करण्यात येत असून एक दिवस राज्याला आम्ही पुढे नेऊ असे प्रतिपादन राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी कल्याणमध्ये केले. आज कल्याणमधील नवीन पत्रीपुल गर्डर लॉचिंग करण्याचे काम सुरू झाले. यावेळी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, एम एस आर डी सी चे राधेश्याम मोपलवार आदींनी कामाची पाहणी केली.

महत्त्वाची बातमी : राज्यपालनियुक्त १२ आमदारांच्या यादीवर भगतसिंह कोश्यारी यांचं अजूनही मौन, सरकार उचलणार मोठं पाऊल ?

मंत्री आदित्य ठाकरे असंही म्हणाले की, पत्रीपूल हा मोठा प्रश्न होता, मात्र तो आता मार्गी लागत असून अशी अनेक कामे राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून होत आहेत. प्रत्येक महिन्याला रखडलेल्या पुलाच्या कामाचा आढावा घेत असून पुढील काही वर्षात राज्याचे रूप बदलेल आणि आम्ही राज्याला पुढे नेऊ. प्रत्येक कामात सर्व जण राजकारण करतात, आम्ही फक्त निवडणुकांपुरतं राजकारण करतो बाकी वेळ विकास कामे करतो, असंही आदित्य  ठाकरे म्हणालेत. 

सोशल डिस्टंसिंगचा फज्जा 

पत्रीपुलाच्या कामाच्या वेळी शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिकांनी शक्ती प्रदर्शन केले. आदित्य ठाकरे यांनी मंडपामध्ये येतात गर्दी पाहून दूर सर्वांना सोशल डिस्टंसिंग पाळण्याच्या सूचना दिल्या .

महत्त्वाची बातमी :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १०८ हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतीस अर्पण केली आदरांजली

जुना पत्रीपुल धोकादायक झाल्याने अचानक तोडण्यात आला, नवीन पत्रीपुल तयार करताना अनेक अडचणी आल्या. मात्र आता पुढील काही महिन्यात हा पूल नागरिकांना वाहतुकीला खुला करू असा दावा खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी केला आहे . नवीन  पत्रीपुल गर्डर लॉचिंग काम सुरू झाले असून ते कामाच्या पाहणीदरम्यान खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी उपस्थितांना संबोधित केलं. ते म्हणालेत की, कुठले ही काम करताना नियोजन लागते मात्र जुना पत्रीपुल धोकादायक झाल्याने तो अचानक दोन वर्षपूर्वी पाडण्यात आला. नवीन पत्रीपुल आराखडा आणि बनविताना अनेक अडचणी आल्या. नागरिकांनाही त्रास झाला, मात्र या पुलाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. आणखी महिन्याभरात हा पूल नागरिकांसाठी खुला होईल असा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

girder work of patripool finally starts in kalyan bridge will be open in month for citizens  

loading image
go to top