राज्यपालनियुक्त १२ आमदारांच्या यादीवर भगतसिंह कोश्यारी यांचं अजूनही मौन, सरकार उचलणार मोठं पाऊल ?

सुमित बागुल
Saturday, 21 November 2020

विधानपरिषदेवरील राज्यपालनियुक्त १२ आमदारांचा प्रश्न अजूनही भगतसिंह कोश्यारी यांच्या कोर्टात आहे.

मुंबई : विधानपरिषदेवरील राज्यपालनियुक्त १२ आमदारांचा प्रश्न अजूनही भगतसिंह कोश्यारी यांच्या कोर्टात आहे. महाविकास आघाडी सरकारकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना 6 नोव्हेंबर रोजी राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नेमणुकीसाठीची यादी सुपूर्त करण्यात आली होती. 21 नोव्हेंबरपर्यंत ही यादी मंजूर करावी अशी विनंती राज्य सरकारकडून राज्यपालांना करण्यात आली होती. आज २१ तारीख आहे, त्यामुळे राज्य सरकारकडून केल्या गेलेल्या विनंतीची मुदत आज संपत आहे. अशात आज राज्यपाल कोश्यारी हे महाविकास आघाडी सरकारकडून आलेल्या यादीवर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

महत्त्वाची बातमी उद्धव ठाकरेंनी घेतली महत्त्वाची बैठक; शिवसेनेनेही फुंकलं २०२२ मुंबई महापालिका निवडणुकांचं रणशिंग

महाविकास आघाडी सरकारकडून निवडण्यात आलेल्या एकूण १२ नावांपैकी ८ नावांवर आक्षेप घेत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. ज्यांच्या नावांविरोधात याचिका केली गेलीये त्या आठ नावांमध्ये एकनाथ खडसे आणि राजू शेट्टी हे देखील आहेत. सदर आठ नावे राजकारण्यांची आहेत, या उमेदवारांची केवळ राजकीय ओळख असून सामाजिक, साहित्यिक क्षेत्रात त्यांचे योगदान नाही, असा दावा या याचिकेत करण्यात आलाआहे. या याचिकेवर येत्या २४ तारखेला मुंबई उच्च न्यायालयात  सुनावणी होणार आहे. 

महत्त्वाची बातमी : "महाराष्ट्रात सरकार आहे की छळछावणी?" आशिष शेलारांची ठाकरे सरकारवर जहरी टीका

दरम्यान, राज्यपालांकडून काही निर्णय घेतला गेला नाही तर राज्य सरकार मंत्रिमंडळ बैठकीत यावर पुन्हा चर्चा करून नवीन प्रस्ताव राज्यपालांना पाठवणार का ? किंवा राज्य सरकार कोर्टाचे दरवाजे ठोठवणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. 

governor bhagatsingh koshyari yet to take decision on the list of governor appointed MLAs


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: governor bhagatsingh koshyari yet to take decision on the list of governor appointed MLAs