मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १०८ हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतीस अर्पण केली आदरांजली

सुमित बागुल
Saturday, 21 November 2020

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी पुकारलेल्या लढ्यात प्राण गमावलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी २१ नोव्हेंबर हा दिवस हुतात्मा स्मृतिदिन म्हणून पाळला जातो.

मुंबई : मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत १०८ हुतात्म्यांनी बलिदान दिलं होतं. त्यांचा आज स्मृतिदिन आहे. त्यामुळे हुतात्म्यांच्या स्मृतिदिनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील हुतात्मा चौक येथे जाऊन हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतीस आदरांजली अर्पण केली.

यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसह राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, मुंबई महापौर किशोरी पेडणेकर, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, पर्यंटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे तसेच मंत्री आदिती तटकरे, मुख्य सचिव संजय कुमार, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर आदी मान्यवर उपस्थित होते.  

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी पुकारलेल्या लढ्यात प्राण गमावलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी २१ नोव्हेंबर हा दिवस हुतात्मा स्मृतिदिन म्हणून पाळला जातो. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत १०८ हुतात्म्यांनी बलिदान दिलं होतं. 

याही बातम्या वाचा : 

>> उद्धव ठाकरेंनी घेतली महत्त्वाची बैठक; शिवसेनेनेही फुंकलं २०२२ मुंबई महापालिका निवडणुकांचं रणशिंग

>> ३१ डिसेंबरपर्यंत महापालिका, सरकारी आणि सर्व खासगी शाळा बंदच राहणार, इकबाल सिंह चहल यांचा निर्णय

>> कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकेत; मुंबई दिल्ली मुंबई रेल्वे सेवा आणि विमान सेवा बंद ?

>> पवारसाहेब, "मराठा स्त्रीला महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री करायची भूमिका तुम्ही घेतली तर त्याला समर्थन"

>> भाजपने आतापासूनच उठाबशा काढल्या तर निदान थोडीफार मजल गाठता येईल, जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला!

>> 26/11 दहशतवादी हल्ला : पोलिस आयुक्तालयात उभे राहतेय भव्य शहीद स्मारक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra cm uddhav thackeray paid tribute to 108 martyr at hutatma chauk