

Girgaon Prostitution Case 2 actress involved
ESakal
मुंबई : काही महिन्यांपूर्वी नवी मुंबईत तुर्भे नाका भागात लॉजमध्ये अनैतिक मानवी तस्कर विरोधी विभागाच्या टीमने मोठी कारवाई केली होती. यावेळी पथकाने अवैध देह व्यापाराचा पर्दाफाश केला असून सात महिलांची सुटका करण्यात आली होती. मुंबईतील हे प्रकरण ताजे असताना आता पुन्हा गिरगाव येथे अशीच घटना घडल्याचे समोर आले आहे. ज्यामध्ये दोन अभिनेत्रींसह सेलिब्रिटींसोबत काम करणाऱ्या एका मेकअप आर्टिस्टला पकडण्यात आले आहे.