गिरीश महाजन संकटमोचन, पराभवाची साडेसाती टाळली

girish mahajan meets hitendra thakur
girish mahajan meets hitendra thakur

मागील पाच दिवसांपासून महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकांची धामधूम सुरू होती. निकालाच्या दिवशीही उत्सुकता ताणली गेली. रात्री एक वाजल्यानंतर मतमोजणी सुरू झाली. अखेर पहाटे धनंजय महाडिक यांचा विजय झाला आणि भाजपची राजकीय खेळी यशस्वी झाली. मागील २० वर्षांपासून बिनविरोध होणारी निवडणूक यंदा भाजपमुळे लादली गेल्याचं सत्ताधाऱ्यांनी म्हटलं होतं. भाजपने सहा जागांसाठी सातवा उमेदवार देत चुरस वाढवली. भाजपने मोठा जुगार खेळला होता. पण फडणवीसांनी निवडणूक जिंकण्यासाठी लढवल्याचं स्पष्ट केलं. (Rajyasabha Election 2022)

देवेंद्र फडणवीस यांना ताप आला होता. यामुळे ते चार दिवस क्वारन्टाईन झाले. यावेळी त्यांनी प्रसाद लाड, गिरीश महाजन आणि आशिष शेलार यांना जबाबदाऱ्या देऊन मोहिमेवर पाठवलं. चंद्रकांत पाटील यावेळी मुंबईतून सूत्र हलवत होते. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव देखील तत्काळ मुंबईत दाखल झाले आणि खलबतांना सुरुवात झाली. (Girish Mahajan)

मात्र यामध्ये गिरीश महाजन यांनी लढवलेली खिंड भाजपच्या पथ्यावर पडली. महाजन यांनी फिरवलेल्या सूत्रांचा फायदा महाडिकांना झाला.

girish mahajan meets hitendra thakur
फडणवीस गेमचेंजर! 'मविआ'ची दहा मतं फुटली

यंदा अपक्षांच्या मतांवर सर्व गणित अवलंबून असल्याने मोठ्या पक्षांकडून त्यांची मनधऱणी करण्याचं काम सुरू होतं. एकीककडे वर्षावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सेनेच्या आमदारांना मार्गदर्शन करत होते. आणि भाजपने पालघरमध्ये डाव टाकण्यास सुरुवात केलेली होती. गिरीM महाजन तातडीने दाखल झाले आणि त्यांनी सूत्र हातात घेतली. (girish mahajan meets hitendra thakur)

भाजप सत्तेत असताना गिरीश महाजन यांची ओळख संकटमोचक अशी बनली होती. कोणताही विषय असो त्यावेळी गिरीश महाजन संकटमोचकाप्रमाणे फडणवीस सरकारची बाजू भक्कम करायचे. याचमुळे भाजपने त्यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली. भाजपला आवश्यक मतांची जुळवाजुळव करण्यासाठी प्रसाद लाड यांना मुंबईतून जबाबदारी देण्यात आली. महाजन यांच्याकडे राज्यातील अन्य आमदारांना गळाला लावण्यासाठी पाठवण्यात आलं. शेलार यांनी तत्काळ दिल्लीला रवाना होत केंद्रीय नेत्यांसोबत खलबतं केली. निवडणुकांचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी प्रसाद लाड यांच्यावर देण्यात आली. या त्रिमूर्तींनी भाजपला विजय मिळवून दिला आहे.

शिवसेनेच्या उमेदवाराला न पडलेल्या मतांमध्ये बविआची तीन मतं असल्याचं संजय राऊत म्हणाले होते. कोल्हापूरचे संजय मामा शिंदे, नांदेडचे श्यामसुंदर शिंदे, देवेंद्र भुयार यांनी आम्हाला मत दिलं नाही, असा दावा संजय राऊत यांनी केला. यानंतर हितेंद्र ठाकूर यांचं महत्व स्पष्ट झालंय.

girish mahajan meets hitendra thakur
बॅग भरूनच 'वर्षा'वर या, राज्यसभेसाठी मुख्यमंत्र्यांची आमदारांसोबत बैठक
girish mahajan meets hitendra thakur
राज्यसभेसाठी आजही हितेंद्र ठाकूर गेमचेंजर! २००१ मध्ये विलासरावांचं सरकार तारलं होतं

सेनेचे नेते पालघरमधून निघताच महाजनांनी समीकरण फिरवलं

महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेलं होतं. मात्र फडणवीसांनी काऊंटर ऑफर दिल्याने ही बोलणी फिस्कटली. यानंतर विविध अपक्षांना गळाला लावण्याचा प्रयत्न सुरू होते. यासाठी तातडीने भाजपचे गिरीश महाजन पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीला दाखल झाले. याआधी शिवसेनेचे खासदार राजन विचारे आणि संजय राऊत याचे बंधू सुनील राऊत दाखल झाले होते. त्यांच्यात बंद दाराआड चार तास चर्चा झाली.

यानंतर भाजपचे संकटमोचन म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांनीही हितेंद्र ठाकूर यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेत, राज्यसभेसाठी पाठिंबा देण्याची विनंती केली आहे. ठाकूर यांच्या पक्षाची पालघरमध्ये पकड आहे. सध्या त्यांच्याकडे तीन आमदार आहेत. राज्यसभेसाठी दिल्लीचा रस्ता अपक्ष आमदार ठरवणार असल्याने सध्या त्यांचा भाव वधारला आहे.

संकटमोचन महाजन

महाजन यांनी याआधीही भाजपच्या अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. सध्या मुंबईतील आमदारांची जबाबदारी प्रामुख्याने शेलार आणि लाड सांभाळत आहेत. उर्वरित महाराष्ट्रातील आमदारांशी संपर्क महाजन हे साधत आहेत. त्यांच्या गळाला किती आमदार लागणरा, याची उत्सुकता आहे.

हितेंद्र ठाकूर... भाजप आणि राणे कनेक्शन!

राज्यसभेसाठी हितेंद्र ठाकूर यांनी पाठिंबा द्यावा, यासाठी भाजपचे नेते आता ठाकूरांच्या कार्यालयात येत आहेत. मात्र यापूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हितेंद्र ठाकूर यांची त्यांच्याच कार्यालयात भेट घेतली होती. याचा विपरीत परिणाम पाहायला मिळाला. कारण भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी ठाकूर यांच्या कार्यालयाजवळ गोंधळ घातला आणि राणेंच्या विरोधात घोषणा दिल्या. यानंतर वसई-विरारमधील स्थानिक भाजपचे कार्यकर्ते हितेंद्र ठाकूर यांच्या बविआ विरोधात असल्याचं कळतंय. मात्र राजकारणात कोणी कोणाच पूर्णवेळ शत्रू किंवा मित्र नसतो. त्यामुळे आता राज्यसभेसाठी ठाकूर यांचा पाठिंबा घेणं भाजपला गरजेचं आहे. महाजनांनी तो मिळवून दिला. आणि भाजप सरस ठरलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com