

Girl beats female TC
ESakal
ठाणे : मुंबईच्या लाईफलाईन लोकल ट्रेन आणि स्थानकांवर वादाच्या बातम्या नियमितपणे येत असताना सोमवारी ठाणे रेल्वे स्थानकावर घडलेल्या एका घटनेने सुरक्षितता आणि प्रवाशांच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एका किशोरवयीन मुलीने कर्तव्यावर असलेल्या महिला तिकीट कलेक्टरसोबत गैरवर्तन केलेच तसेच तिच्यावर प्राणघातक हल्लाही केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.