

Vasai School Girl Died After 100 Sit-Ups
ESakal
नालासोपारा : आमची परिस्थिती गरीब, दाह बाय दहाच्या खोलीत आमचा संसार, दिवसभर काम केल्यानंतर रात्रीची चूल पेटते. मुलीला शिकवून तिला मोठे करायचे होते. पण ज्या शाळेत तिच्या भविष्याची स्वप्नं पाहिली त्याच शाळेने माझ्या मुलीचा जीव घेतला. माझ्या पोटचा गोळा गेला हो, असा आक्रोश व्यक्त करीत मृत काजोलच्या आईने वेदनादायी भावना व्यक्त करीत विकृत शिक्षिकेवर गुन्हा दाखल करून प्रशासनापुढे न्यायाची मागणी केली आहे.