esakal | लव्ह, टॅटू, धोका... आणि मग...
sakal

बोलून बातमी शोधा

लव्ह, टॅटू, धोका... आणि मग...

लव्ह, टॅटू, धोका... आणि मग...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : प्रेमात सगळं काही माफ असतं असं म्हणतात, मात्र प्रेमात कधी कोण आणि काय करेल काहीही सांगता येत नाही. ठाण्यात प्रेमभंग झाल्यामुळे एका तरुणीनं चक्क आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे ठाण्यात पाचपाखाडी इथल्या दांडेकरवाडीमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

प्रेमात बुडालेल्या एका तरुणीनं तिच्या प्रियकराला लग्नासाठी होकार दिला त्याबद्दल तिनं आपल्या घरच्यांनाही सांगितल होतं. विशेष म्हणजे तिनं त्याच्या नावाचं टॅटूही काढलं होतं. मात्र तिच्या प्रियकरानं ऐनवेळी लग्नाला नकार दिला आणि हा धक्का सहन न झाल्यामुळे तिनं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

ही बातमी वाचली का? अबब... एवढा मोठा मासा जाळ्यात!

२१ वर्षाच्या तरुणीची तिच्याच वयाच्या सूरज शिर्केसोबत मैत्री झाली होती. त्यानंतर सूरज यानी तरुणीला लग्नासाठी विचारलं होतं. त्यावर या तरुणीनं लग्नासाठी होकार दिल्यानंतर तिने घरच्यांनाही सूरजसोबत लग्न करण्याची इच्छा आहे हे सांगितलं होतं. विशेष म्हणजे तिनं त्याच्या नावाचा टॅटू देखील काढला होता. काही दिवसानंतर, तरुणीनं सुरजला लग्नासाठी आग्रह करायला सुरुवात केली. मात्र सुरजनं तिला नकार दिला आणि रिलेशनशिप संपवली. तिला हा मोठा धक्का सहनझाला नाही आणि तिने गळफास लावत आत्महत्या केली.

ही बातमी वाचली का?  म्हणाली बाजारातून कपडे खरेदी करून येते आणि...

तरुणी ही खाजगी शिकवणीत नोकरी करत होती. सूरजच्या नकारामुळे ही तरुणी मागच्या काही दिवसांपासून तणावात होती. आपल्या आत्याकडे गेली असताना ही तरुणी बेडरूममध्ये गेली आणि बरांच काळ उलटूनही ती बाहेर न आल्यामुळे घरच्यांना संशय आला. त्यांनी तातडीनं बेडरूम गाठली मात्र तोपर्यंत तिची प्राणज्योत मालवली होती.

या प्रकरणी सूरज याच्यावर आत्महत्येसाठी तरुणीला प्रवृत्त केल्याचा गुन्हा पोलिसांकडून नोंदवण्यात आला. तसंच तरुणीचं पार्थिव शरीर शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलं. या सगळया प्रकरणामुळे तरुणीच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. 

girl with tattoo from thane took extreme step after her boyfriend ends relation