शाळेच्या शुल्कात 50 टक्के सवलत द्या, मनसे उभारणार जन आंदोलन

शाळेच्या शुल्कात 50 टक्के सवलत द्या, मनसे उभारणार जन आंदोलन

मुंबई: लॉकडाउनच्या कालावधीत आर्थिक दृष्ट्या भरडल्या गेलेल्या पालकांकडून शाळा शुल्क वसुली करत आहेत. ऑनलाइन शाळा सुरु असताना पालकांकडून 100 टक्के शुल्क वसूल करण्याच्या शाळांच्या भूमिकेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध दर्शिविला आहे. विद्यार्थी शाळांतील विविधांचा लाभ घेत नसल्याने शाळांनी 50 टक्केच शुल्क घ्यावे, अशी भूमिका पक्षाने घेतली आहे. सरकार पालकांना कोणताही दिलासा देत नसल्याने याविरोधात जन आंदोलन करण्याचा इशारा पक्षाने दिला आहे.

कोरोनामुळे शाळा अद्यापही बंद आहेत. शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यात येत आहे. यानंतरही शाळा पालकांकडून वाढीव शुल्क वसूल करत आहेत. शाळा केवळ विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देत आहेत. याव्यतिरिक्त शाळांतील इतर सुविधांचा वापर विद्यार्थी करत नाहीत. याबरोबरच अनेक पालकांना नोकरी, व्यवसाय गमवावा लागल्याने पालकांना शुल्क भरणे अशक्य आहे. यानंतरही शाळा पालकांना शुल्क भरण्यासाठी तगादा लावत आहेत. शुल्क न भरण्याच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणापासून दूर ठेवण्यात येत आहे.

इतर राज्यातील सरकारनी विविध घटकांना दिलासा दिला. मात्र राज्य सरकारने कोणासही दिलासा दिलेला नाही. पालकांची बिकट परिस्थिती पाहता सरकारने पालकांना दिलासा देणे गरजेचे आहे. यासाठी सरकारच्या तिजोरीवर एक रुपयाचा ही ताण न येता केवळ शाळांनी ऑनलाइन शिक्षणाचे केवळ 50 टक्के शुल्क घ्यावे असा निर्णय जाहीर करावा, अशी मागणी मनसेचे दादर शाखा अध्यक्ष मयुर सारंग यांनी केली आहे.

सरकार पालकांना दिलासा देण्याकडे दुर्लक्ष करत आल्याने याचा निषेध करण्यासाठी मनसे एक जन आंदोलन हाती घेत आहे. यासाठी पालकांकडून गुगल फॉर्म भरून घेण्यात येत आहे. या फॉर्म मधील पालकांची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना देण्यात येणार असल्याचे सारंग यांनी सांगितले.

--------------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Give 50 percent discount in school fees MNS will build mass movement

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com