वीजचोरीची माहिती देणाऱ्यास बक्षीस 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

मुंबई  - वीजचोरांची माहिती देणाऱ्यास बक्षीस देण्याचा निर्णय बेस्टने घेतला आहे. वीजचोरीला आळा घालण्यासाठी आणि होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी हे पाऊल उचलले असल्याचे बेस्टच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

मुंबई  - वीजचोरांची माहिती देणाऱ्यास बक्षीस देण्याचा निर्णय बेस्टने घेतला आहे. वीजचोरीला आळा घालण्यासाठी आणि होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी हे पाऊल उचलले असल्याचे बेस्टच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

पकडलेल्या वीजचोरीच्या दहा टक्के पैसे माहिती देणारास मानधन म्हणून देण्याची कायद्यात तरतूद आहे. बेस्टच्या वीजपुरवठा क्षेत्रातील झोपडपट्टी, मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीयांच्या वसाहतीमधील वीजचोरीचे प्रकार बेस्टने उघडकीस आणले आहेत. बेस्टच्या दक्षता पथकाने दोन वर्षांत दोन हजार वीजचोऱ्या पकडल्या आहेत. 2016 मध्ये बेस्टने पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीतून तीन कोटी 80 लाखांची वसुली केली. ग्राहकांकडून वसूल केलेल्या तीन कोटी 28 लाखांच्या दंडाचा यात समावेश आहे.

Web Title: give electricity theft Information

टॅग्स