ठाण्यात घरोघरी ताप सर्वेक्षण, कॅान्टॅक्ट ट्रेसिंगला प्राधान्य द्या; महापालिका आयुक्तांच्या अधिकाऱ्यांना सूचना

सकाळ वृत्तेसवा 
Wednesday, 10 June 2020

घरोघरी ताप सर्वेक्षण प्रभावीपणे करण्याबरोबरच कॅान्टॅक्ट ट्रेसिंगच्या कामाला प्राधान्य देण्याच्या सूचना महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी येथे झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या. 

मुंबई: घरोघरी ताप सर्वेक्षण प्रभावीपणे करण्याबरोबरच कॅान्टॅक्ट ट्रेसिंगच्या कामाला प्राधान्य देण्याच्या सूचना महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी येथे झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या. 

या वेळी मालेगावमध्ये यशस्वीपणे काम करणारे सनदी अधिकारी पकंज आशिया यांनी मालेगावमध्ये केलेल्या कामाची माहिती बैठकीत दिली. बैठकीस सनदी अधिकारी आणि कोव्हीडसाठी नियुक्त विशेष अधिकारी रंजीत कुमार हेही उपस्थित होते. 

हेही वाचा: पावसाळ्यात कोरोनाचा फैलाव वाढणार? आयआयटी मुंबईचा नवा अंदाज; वाचा नेमकं काय आहे तर...

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी घरोघरी प्लस ॲाक्सीमीटर आणि थर्मल स्कॅनरच्या माध्यमातून ताप सर्वेक्षण प्रभावीपणे करण्याची गरज असून त्यामधून तापसदृष्य किंवा कोरोना सदृष्य लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना तत्काळ क्वारंटाईन सेंटरमध्ये स्थलातंरित करण्यात यावे, असे सांगून फिव्हर ओपीडीसह कॅान्टॅक्ट ट्रेसींगला प्राधान्य देण्यात यावे, असे निर्देश आयुक्त सिंघल यांनी या वेळी दिले.

हेही वाचा: धारावीत आज 'इतके' नवे रुग्ण; दादर-माहीम मध्येही रुग्णवाढ नियंत्रणात..

प्रभावीपणे अंमलबजाणीचे निर्देश:

मिशन बिगिन अगेन अंतर्गत बाजारपेठा उघडण्यात आल्या असून पी 1, पी 2 प्रमाणे कार्यवाही होते की नाही, याची पोलिसांशी समन्वय साधून प्रभावीपणे अंमलबजाणी करावी, अशा सूचना आयुक्त विजय सिंघल यांनी दिल्या. प्रभाग समितीतंर्गत पालिकेच्या शाळा असतील, तर त्या क्वारंटाईन सेंटरसाठी वापरव्यात, असेही सिंघल यांनी सांगितले.

give importance to fever testing and contact tracing in thane   

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: give importance to fever testing and contact tracing in thane