धारावीत आज 'इतके' नवे रुग्ण; दादर-माहीम मध्येही रुग्णवाढ नियंत्रणात..

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 10 June 2020

मुंबईच्या धारावी, दादर आणि माहीम या भागांमध्ये आता कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात येतेय. प्रशासनानं राबवलेल्या उपाय योजनांमुळे या भागांमध्ये रुग्णसंख्या वाढ रोखण्यात प्रशासनाला यश आलं आहे. 

मुंबई : मुंबईच्या धारावी, दादर आणि माहीम या भागांमध्ये आता कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात येतेय. प्रशासनानं राबवलेल्या उपाय योजनांमुळे या भागांमध्ये रुग्णसंख्या वाढ रोखण्यात प्रशासनाला यश आलं आहे. 

 धारावीमध्ये रुग्णसंख्या नियंत्रणात येत असून आज केवळ 11 नवीन रुग्णांची नोंद झाली. धारावीतील रुग्णसंख्या 1964 वर पोहोचली आहे. धारावीसह दादर-माहीम परिस्थिती ही नियंत्रणात येत असल्याचे दिसत असून रुग्णसंख्या घटली आहे.

हेही वाचा: ट्विटरचं नवं फीचर; स्टोरी स्वरुपात शेअर करता येणार तुमचं 'फ्लीट्स'...

आज धारावीत 11 नवीन रुग्ण सापडल्याने रुग्णांची संख्या 1964 वर पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा 73 वर पोहोचला आहे. 

माहीम मध्ये आज 25 नवीन रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची संख्या 701 इतकी झाली आहे. तर मृतांचा आकडा 13 इतका आहे. तर दादर मध्ये आज 15 नवीन रुग्ण सापडले असून एकूण रुग्णांची संख्या ही 446 इतकी झाली आहे. तर आजपर्यंत 15 मृत्यू झाले आहेत. 

हेही वाचा: मुंबईत पुन्हा लागणार कडक लॉकडाऊन ? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत...

धारावीसह दादर आणि माहीम मधील परिस्थिती देखील नियंत्रणात आल्याचे दिसते. जी उत्तर विभागात आज दिवसभरात 51 नवीन रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णांची संख्या 3111 इतकी झाली आहे. तर मृतांचा आकडा 100 इतका आहे.

increasein patients of dharavi now in control 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: increasein patients of dharavi now in control