कोरोना पॉझिटिव्ह एसटी कर्मचाऱ्यांना न्याय द्या, प्रीतम मुंडेंचं परिवहन मंत्र्यांना पत्र

कोरोना पॉझिटिव्ह एसटी कर्मचाऱ्यांना न्याय द्या, प्रीतम मुंडेंचं परिवहन मंत्र्यांना पत्र

मुंबई: राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांना रोटेशन पद्धतीने मुंबईतील बेस्ट उपक्रमात कर्तव्यावर बोलावल्या जात आहे. मात्र, मुंबईतून परत गेल्यानंतर एसटी कर्मचारी मोठ्या संख्येने कोरोनाबाधित होत असल्याने, अशा कर्मचाऱ्यांना शासन स्तरावरून औषधोपचार, आर्थिक सहाय्य आणि इतर शासकीय सुविधा त्वरित पुरवणे आवश्यक असून, पगारी रजा ग्राह्य धरण्याची मागणी खासदार डॉ.प्रीतम मुंडे यांनी परिवहन मंत्री ऍड.अनिल परब यांच्याकडे केली आहे.

सांगली, सोलापूर, नाशिक, ठाणे, मुंबई विभागात सर्वात जास्त कोरोनाबधित कर्मचारी आहे. यामध्ये सांगली विभागात 385 त्याप्रमाणेच सोलापूर 283, नाशिक  238, ठाणे 249, मुंबई विभागात 155 कर्मचारी कोरोना बाधित झाले आहे. यामध्ये बीड जिल्ह्यात 400 पैकी 146 कर्मचारी बाधित झाल्याने खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी परिवहन विभागाला पत्र पाठवले आहे. त्यासोबतच आमदार लक्ष्मण पवार यांनी सुद्धा गेवराई आगारातील 20 एसटी कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याने त्यांना शासकीय सुविधा देण्याची मागणी केली आहे.

मुंबई येथील बेस्ट उपक्रमासाठी बीड विभागातील चालक, वाहकांना रोटेशनप्रमाणे पाठवले जात आहे. ते परतल्यावर त्यांची कोरोना चाचणी केली असता आतापर्यंत तब्बल १९० लोकांना बाधा झाल्याचं उघड झालं आहे. मुंबईतल्या बेस्ट उपक्रमासाठी बीड विभागातून २५ ऑक्टोबरपासून प्रत्येक आठवड्याला ४६० कर्मचारी  पाठवण्यात येत आहेत. आतापर्यंत तब्बल १३५० कर्मचारी पाठवण्यात आलेत. कर्तव्य बजावून ते परतल्यावर त्यांची कोरोना चाचणी केली असता १९० कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आलेत. परत येताना आणि आल्यावर त्यांचे कुटुंब, नातेवाईक, प्रवासी यांच्याशी संपर्क येत असल्यानं संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जातेय. 

------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Give justice Corona Positive ST employees BEST initiative Letter Pritam Munde anil parab

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com