मुंबई : मंदिराच्या भिंतीवर देवीचा चेहरा दिसल्याची अफवा, भाविकांची गर्दी

Devi face on temple wall rumor
Devi face on temple wall rumorsakal media

चेंबूर : गणेश मूर्ती, महादेवाच्या नंदीची मूर्ती दूध पित असल्याची अफवा पसरल्याच्या घटनेला एक महिना पूर्ण होत असतानाच मुंबईतील (Mumbai) एका मंदिराच्या भिंतीवर देवीचा चेहरा ( Goddess Devi face on mall) दिसल्याची अफवा (Rumor) पसरली आणि मंदिराच्या बाहेर भाविकांची गर्दी (Devotees crowd) झाली. शीतला माता मंदिराच्या (Sheetala mata temple) भिंतीवर देवीचा चेहरा दिसल्याचे भाविकांचे म्हणणे असून याचे व्हिडिओ व्हायरल (viral video) झाल्यानंतर मंदिरात हजारो भाविक पोहोचले.

Devi face on temple wall rumor
करारा जवाब मिलेगा! 'राज' सभेपूर्वी मनसेकडून टीझर रिलीज

कुर्ला येथील ठक्कर बाप्पा पाडा नंबर 3 जवळील शीतला माता मंदिरात शुक्रवारी रात्री भजन सुरू असताना अचानक शीतला देवीचा चेहरा मंदिरावरील मार्बलवर दिसल्याचे भाविकांचे म्हणणे आहे. ही अफवा पसरताच अनेकांनी मंदिराची वाट धरली असून मदिरात भाविकांनी देवीचे दर्शन घेण्याकरिता तुफान गर्दी केलीय.

ठक्कर बाप्पा परिसरात राजस्थान व गुजरात मधील काठेवाडी नागरिक मोठ्या प्रमाणात राहत आहेत. या परिसरात हे नागरिक मोठ्या प्रमाणात नवरात्री उत्सव साजरा करतात.शुक्रवारी नवरात्री उत्सवाच्या शेवटचा दिवस असल्याने नागरिकांनी शितला देवीच्या मंदिरात रात्र जागत भजन गात होते. अचानक काही भक्तांना शीतला देवीच्या मंदिरावरील मार्बलवर देवीचा हसरा चेहरा दिसल्याचे सांगितले जाते. हा दैवी चमत्कार असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com