धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर झवेरी बाजारात सुवर्णतेजी! कोरोनातही सुवर्ण खरेदी जोरात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर झवेरी बाजारात सुवर्णतेजी! कोरोनातही सुवर्ण खरेदी जोरात

झवेरी बाजारात आज दिवाळीच्या सुरुवातीला धनत्रयोदशीला सोने खरेदीला प्रारंभ झाला असून, महिलांचा उत्तम प्रतिसाद लाभल्याने व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर तेजी आली आहे.

धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर झवेरी बाजारात सुवर्णतेजी! कोरोनातही सुवर्ण खरेदी जोरात

मुंबादेवी ः झवेरी बाजारात आज दिवाळीच्या सुरुवातीला धनत्रयोदशीला सोने खरेदीला प्रारंभ झाला असून, महिलांचा उत्तम प्रतिसाद लाभल्याने व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर तेजी आली आहे. गेल्या वर्षी 49 हजार 500 रुपये तोळ्याचा भाव असणारे सोने यंदा कोरोनातही तोळ्याला 53 हजारांवर पोहचले आहे. असे असतानाही खरेदीस उत्तम प्रतिसाद लाभत आहे. यामुळे झवेरी बाजाराची फिकी पडलेली लकाकी पुन्हा चमकू लागली आहे. 

दिवाळी खरेदीसाठी बाजारांमध्ये मोठी गर्दी; नागरिकांनी सोडली कोरोनाची भीती

कोरोनामुळे सामाजिक अंतर, सॅनिटायझर, मास्क लावलेले सेल्स एक्‍झिक्‍युटिव्ह ग्राहकांच्या स्वागताला सकाळपासूनच सज्ज असल्याचे दिसत आहे. आज दुपारी 1 नंतर झवेरी बाजारात नटूनथटून आलेल्या पण तोंडावर मॅचिंग मास्क परिधान केलेल्या महिला दिसल्या. पारंपरिक पोषाख, साडी, चुडीदार, लेहंगा कुर्ता तर काही मॉर्डन जीन्स शर्टस, टी शर्टसवर सोनेखरेदीला असलेल्या पाहायला मिळाल्या. यात खासगी उच्च पगारी नोकरदार आणि काही शासकीय कर्मचारी महिलांचा 
कल ब्रॅंडेड दुकानांकडे पाहायला मिळाला. 

कोरोना ओसरला बाजार बहरला! किरकोळ दुकानदारांना अनेक महिन्यानंतर दिलासा

साडेतीन मुहूर्तानंतर धनत्रयोदशी हा मोठा मुहूर्त सोने खरेदीस असल्याने महिलांचा रोख सोने खरेदीस असतो. सोने जरी उच्चांकी भावात 53 हजारांच्या घरात असले तरी आम्ही निदान एखाद तोळा दर वर्षी खरेदी करतोच. यात एक वेगळा आनंद आणि गुंतवणूकही होते. 
- संगीता राजीव शर्मा,
ग्राहक 

कोरोनामुळे यंदा धनत्रयोदशीला सोने खरेदीस लोकांचा प्रतिसाद किती लाभेल हा प्रश्‍न आज मोडीत निघाला. लोकांनी तयार सोने खरेदीस उत्तम प्रतिसाद दिल्याने 53 हजारी सोने विक्री म्हणजे झवेरी बाजारावर धनाची बरसात झाल्यासारखे आहे. 
- कुमार जैन,
अध्यक्ष, इंडिया बुलियन्स अँड ज्वेलरी असोसिएशन 

Gold buying in Zaveri Bazaar on the occasion of Dhantrayodashi 

----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image
go to top