esakal | तरुणाच्या प्रसंगावधानामुळे सोनसाखळी चोर अटकेत
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

तरुणाच्या प्रसंगावधानामुळे सोनसाखळी चोर अटकेत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : ऐरोलीतील (Airoli) एका तरुणाने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे वृद्ध महिलेच्या गळ्यातील दागिने लुटून साथीदारासह दुचाकीवरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या एकाला पकडण्यात यश आले.

रबाळे पोलिसांनी अटक केलेला लुटारू शुक्रवारी सकाळी ऐरोली सेक्टर-८ एका वृद्धेच्या गळ्यातील दागिने लुटण्यासाठी तिच्या मागे जात असल्याचे आणि तो दुचाकीवरून आलेल्या साथीदारास इशारा करीत असल्याचे निखिल यशवंते याच्या निदर्शनास आले. त्याच वेळी लुटारूने वृद्धेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून दुचाकीवरील साथीदारास इशारा केला आणि पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच निखिलने त्याच्याजवळील बॅग सोनसाखळी चोराच्या दिशेने भिरकावली. त्यासरशी दुचाकीवरील दोघे लुटारू खाली पडले.

हेही वाचा: कल्याण- डोंबिवलीतील रस्ते आणि त्यावरील खड्डे नागरिकांनी केले ट्रोल

त्यासरशी नागरिकांनी लुटारूंवर झडप घालून त्यांना पकडले. त्यातील एकाने नागरिकांच्या तावडीने सुटका करून घेत तेथून पळ काढला. नागरिकांनी लुटारूला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले.

loading image
go to top