

Gold Silver Rate share market
esakal
Gold Silver Rate Maharashtra : अमेरिका इराण युद्धाचा थेट परिणाम सामान्यांच्या जनजीवनावर पडला आहे. सध्या लग्नसराईचा काळ सुरू असल्याने सोने चांदी खरेदीकडे अनेकांचा कल आहे. परंतु, आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे गेल्या काही दिवसांत अस्थिरता पाहायला मिळत आहे. दरम्यान मागच्या आठवड्यापासून सोन्याच्या किमतीत घसरण पहायला मिळत आहे. तर चांदी दरात मोठी घसरण पहायला मिळाली. मागच्या २४ तासांत २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम १० रुपयांनी घट झाली. तर तीन दिवसांत चांदी प्रति किलो तब्बल १० हजार १०० रुपयांनी घसरली आहे.