भाईंदरमध्ये आढळला सुवर्ण कोल्हा

Golden-Fox
Golden-Fox
भाईंदर - डोंगराळ भागातील वस्तीत बिबट्याचे दर्शन होत असल्याचे ऐकिवात असतानाच भाईंदर येथे नेहरूनगर झोपडपट्टीत रविवारी (ता. 10) रात्री सुवर्ण कोल्हा आढळून आला. त्याच्या पायाला दुखापत झाल्याने तो खाडीच्या जंगलातून मानवी वस्तीत आल्याचे प्राणिमित्रांकडून सांगण्यात आले. अगोदर हा कुत्रा असल्याचे भासल्याने नागरिकांनी त्याला हाकलून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, भुंकण्याऐवजी कुई-कुई करण्यास सुरवात केल्याने हा जंगली कोल्हा असल्याचे समजले. काही दक्ष नागरिकांनी याबाबत तातडीने अग्निशामक दलाचे जवान व प्राणिमित्रांनी कोल्ह्याला पकडून वन विभागाच्या ताब्यात दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com