सुवर्ण मिठाईच्या दरात आर्थिक मंदीमुळे घट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑक्टोबर 2019

ठाणे : दिवाळी सणात जितके महत्त्व दिव्यांना असते तितकेच महत्त्व फराळ व मिष्ठान्नाला असते. त्यातच गेल्या काही वर्षांपासून दीपावली सणाच्या काळात लोकांकडून भेट देण्यासाठी सुवर्ण मिठाईची देवाण-घेवाण करण्याचे प्रमाण वाढले आहे; मात्र यंदा मिठाई बाजारपेठेला आर्थिक मंदीचा फटका बसला असून ग्राहकांचा प्रतिसात मिळवण्यासाठी दुकानदारांनी मिठाईच्या किमती कमी केल्या आहेत.

आज बाजारात वेगवेगळ्या नावाचे मिठाईचे शेकडो प्रकार उपलब्ध आहेत. यात प्रामुख्याने पेढे, बर्फी, गुलाबजाम, लाडू, काजू कतली, हलवा, रसगुल्ले, सोनपापडीसह वेगवेगळी चॉकलेटस्‌ असे शेकडो प्रकार येतात. याशिवाय प्रांतनिहाय मिठाईचे हजारो प्रकार आढळतात. ठाण्यात सध्या चक्क सोन्याचा वर्ख असलेल्या मिठाईची चर्चा जोरात आहे.

भामरा बदामासह सुकामेवा आणि दुग्धजन्य पदार्थापासून बनवलेल्या या सुवर्ण मिठाईवर अस्सल सोन्याचा वर्ख लावण्यात आला असून उच्चभ्रू ग्राहकांसाठी वेगवेगळ्या तऱ्हेच्या पॅकिंगमध्ये ही मिठाई उपलब्ध आहे. यात आमदार पेटीची किंमत साडेनऊ हजार; तर इतर दोन छोट्या साधारण पेट्या साडेतीन हजार रुपयांत उपलब्ध आहेत; मात्र यंदा आर्थिक मंदीमुळे गेल्या वर्षी १२ हजार रुपये किलो असणारी सुवर्ण मिठाई यंदा ११ हजार रुपये दराने विक्रीस उपलब्ध आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Golden sweet rates down