आनंदाची बातमी : 1076 रुग्ण कोरोनामुक्त 

सकाळ वृत्तसेवा 
Sunday, 26 April 2020

मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे धास्ती वाढलेली असतानाच बरे होऊन घरी गेलेल्यांमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या मुंबईची आहे. या शहरातून 768 रुग्ण बरे झाले आहेत. त्यापाठोपाठ पुणे महापालिका परिसरात 120 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. 
 

मुंबई : राज्यात कोरोना संसर्गाचा कहर जरी कायम असला तरी कोरोना संसर्गातून बरे होणाऱ्यांची संख्याही दररोज वाढत आहे. आजपर्यंत राज्यभरात 1 हजार 76 रुग्ण या आजारातून ठणठणीत बरे झाले आहेत. यामध्ये मुंबईतील रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. सध्या 6 हजार 229 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे धास्ती वाढलेली असतानाच बरे होऊन घरी गेलेल्यांमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या मुंबईची आहे. या शहरातून 768 रुग्ण बरे झाले आहेत. त्यापाठोपाठ पुणे महापालिका परिसरात 120 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. 

हे वाचा :उद्धव ठाकरेंना राज्यपालांचा फोन... 

राज्यात कोरोना रुग्ण बरे होणाऱ्यांची संख्याही दिवसागणिक वाढतेय. 23 मार्चला पहिले दोन रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यानंतर आतापर्यंत साधारणत: महिन्याभरात 1 हजार 76 रुग्ण घरी गेले आहे. हे प्रमाण पाहता राज्यात दररोज सुमारे 26 रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत. 

हे वाचा : नवी मुंबई विमानतळाचे काम पुन्हा वेगाने

यामध्ये अहमदनगर महापालिका 5, अहमदनगर ग्रामीण 11, औरंगाबाद महापालिका 14, बुलढाणा 8, गोंदीया, हिंगोली, जळगाव महापालिका प्रत्येकी 1, कल्याण-डोंबिवली 31, कोल्हापूर महापालिका 2, लातूर ग्रामीण-8, मीरा भाईंदर मनपा- 5, मुंबई महापालिका 768, नागपूर महापालिका 12, नाशिक महापालिका आणि ग्रामीण प्रत्येकी 1, नवी मुंबई 19, उस्मानाबाद 3, पालघर ग्रामीण 1, पनवेल महापालिका 13, पिंपरी-चिंचवड महापालिका 12, पुणे महापालिका 120, पुणे ग्रामीण 5, रायगड ग्रामीण 3, रत्नागिरी , सांगली ग्रामीण- 26, सातारा- 3, सिंधुदूर्ग-, ठाणे मनपा 16, ठाणे ग्रामीण- 4, उल्हासनगर मनपा- 1, वसई-विरार महापालिका 12 यवतमाळ 7 यांचा समावेश आहे. 

प्लाझ्मा थेरपीचा आधार 
कोरोना बाधितांवर उपचारासाठी आता प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना रुग्णांवरील प्लाझ्मा थेरपीला केंद्र सरकारची परवानगी मिळाल्याने मुंबई आणि पुणे शहरात प्रायोगिक तत्वावर सुरूवात केली आहे. 

प्लाझ्मा थेरपीसाठी लागणारी प्रक्रिया पूर्ण होऊन कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णांकडून प्लाझ्मा युनिट कोरोना रुग्णाच्या उपचारासाठी वापरणार आहेत. हा उपचार पात्र ठरलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार देण्यात येणार आहे. या रुग्णांची रक्त गट तपासणी करून प्लाझ्मा जुळविण्यात येणार आहेत. या प्रक्रियेसाठी लागणारा प्लाझ्मा फेरेसिस मशीन तयार करण्यात आले आहे. यामुळे कोरोना आजारापासून बरे झालेल्या रुग्णांना बोलावून प्लाझ्मा चे विलगिकरण करण्याची प्रक्रिया जलद गतीने व प्रभावीपणे करणे शक्‍य होईल. या थेरपी चा लाभ गंभीर प्रकारच्या रुग्णांना होईल. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांना या आजारातून लवकर बरे होण्यास मदत मिळणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good news: 1076 patients have recovered