मद्यप्रेमींनो खुशखबर ! आता दारुसाठी फटके खाण्याची अजिबात गरज नाही, कारण.. 

मद्यप्रेमींनो खुशखबर ! आता दारुसाठी फटके खाण्याची अजिबात गरज नाही, कारण.. 

मुंबई : मद्यप्रेमींना यापुढे वाईन शॉपपुढच्या रांगेत उभ राहून, फटके खाण्याची वेळ  न येण्याची शक्यता आहे. या मद्यशौकीनांसाठी घरपोच मद्यविक्री सुरु करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. ‘झोमॅटो’ या कंपनीने दारुची घरपोच सेवा उपलब्ध करुन देण्यात रस दाखवला आहे. लॉकडाऊनमुळे देशात दारुविक्री बंद होती. मात्र लॉकडाऊन शिथील केल्यानंतर दारुविक्रीस परवानगी मिळाल्यानंतर दारुच्या मागणीत, विक्रीत प्रंचड वाढ झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे या परिस्थितीचा लाभ घेण्याचा ‘झोमॅटो’चा विचार आहे. या संदर्भात विवीध राज्यांशी बोलणी सुरु असून लवकरचं याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

सोशल डिस्टंन्सिंगवरचा उतारा 
लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर देशभरात वाईन शॉपपुढे लागलेल्या रांगा, मद्याची किती मागणी आहे, हे दर्शवत होत्या. मात्र मद्यप्रेमींच्या गर्दीमुळे  सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा उडाला, त्यामुळे मुबईसह काही शहरात वाईन शॉप तातडीने बंद करावे लागले. त्यानंतर घरपोच मद्यविक्रीची कल्पना समोर आली. लॉकडाऊन काळातील परिस्थितीमुळे घरपोच मद्यविक्रीची संकल्पना प्रत्यक्षात येण्याची दाट शक्यता आहे. 

देशात अजूनपर्यंत घरपोच मद्यविक्रीला परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र इंटरनॅशनल स्पिरीट अँड वाईन असोसिएशन ऑफ इंडीया या दारु उत्पादकांची आघाडीची संघटनाही घरपोच दारुच्या वितरणासाठी अनूकूल आहे. संघटनेची विवीध राज्य सरकारांशी बोलणीही सुरु आहे. तंत्रज्ञानावर आधारीत घरपोच दारुविक्रीमुळे एक जबाबदार व्यवस्था निर्माण होऊ शकते असं विधान झोमॅटोचे कार्यकारी अधिकारी मोहीत गुप्ता यांनी केलं. त्यावरुन झोमॅटो होमडिलीवरी व्यवसायाची तयारी करत असल्याचे संकेत मिळाले आहे. त्यामुळे लवकरचं राज्य सरकारे या संदर्भात निर्णय घेऊ शकतात,  असं जाणकारांनी म्हटले आहे. मात्र परवानाधारक वाईन शॉपमालक या विक्रीला तिव्र विरोध करुन शकतात.

दोन राज्यात घरपोच मद्यविक्री : 
पंजाब आणि छत्तीसगड या राज्य सरकारांनी मद्याच्या घरपोच सेवेला मंजूरी दिली असून. लवकरचं अनेक राज्य सरकारेही घरपोच सेवेसाठी अनूकूल आहेत. राज्यांच्या महसूलात दारुविक्रीचा मोठा वाटा आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात राज्याची आर्थिक बाजू सावरण्यासाठी मद्यविक्रीची परवानगी देण्यात आली आहे.

good news for all liquor lovers read full news about how liquor will be delivered to your doorstep

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com