Mumbai AC Local : खुशखबर! 'मरे'वर आणखी १२ एसी लोकल फेऱ्या; एकूण संख्या १२० वर

प्रवाशांकडून वाढत्या प्रतिसादानंतर रेल्वेचा निर्णय; मुख्य मार्गावरील सेवा ८० वरून ९२ होणार.
Mumbai AC Local Service

Mumbai AC Local Service

sakal

Updated on

- नितीन बिनेकर

मुंबई - एसी लोकलला प्रवाशांकडून मिळणारा वाढता प्रतिसाद आणि अतिरिक्त फेऱ्यांची सातत्याने होत असलेली मागणी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने आणखी १२ नवीन एसी लोकल फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या सेवा लवकरच सुरू करण्यात येणार असून, त्यामुळे मध्य रेल्वेवरील एसी लोकल फेऱ्यांची एकूण संख्या १०८ वरून १२० पर्यंत पोहोचणार आहे. विशेष म्हणजे या सर्व नवीन फेऱ्या मुख्य मार्गावर चालविण्यात येणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com