धारावीतील कोरोनाबाबत आनंदाची बातमी, धारावीचे कोरोना ग्रहण सुटू लागले

धारावीतील कोरोनाबाबत आनंदाची बातमी, धारावीचे कोरोना ग्रहण सुटू लागले

मुंबई, धारावी : कोरोना चे संक्रमण मुंबईत सुरु झाली त्यात धारावीत कोरोनाचे एकामागून एक रुग्ण सापडू लागले होते. यामुळे धारावी सरकारी यंत्रणेच्या रडारवर आली. त्याआधी वरळी हे कोरोना चे मोठे हॉटस्पॉट बनत असतानाच धारावीत रुग्णांची दिवसेंदिवस संख्या वाढत चालली होती. यामुळे धारावीबद्दल चिंता वाढू लागली होती. गेली दोन महिन्यांपासून रुग्ण वाढीची चिंता वाढत असतानाच गेली काही दिवसांपासून धारावीतील कोरोना ची लागण झालेल्या रुग्ण संख्येत घट होऊ लागली आहे. यामुळे स्थानिक रहिवासी व सरकारी यंत्रणांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. 

जिद्दीपुढे कोरोना हरला....
धारावीमध्ये करोनाचा फैलाव मोठया प्रमाण होत असल्याने सरकारी यंत्रणेचे धाबे दणाणले होते. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या दाट लोकवस्तीतीत कोरोनाचा संसंर्ग रोखणे हे फार मोठे आव्हान होते. करोनाचे उच्चाटन करण्यासाठी सरकारी यंत्रणांनी अहोरात्र अथक परिश्रम घेत ‘मिशन धारावी’राबवले. घरोघरी जाऊन रहिवाशांची तपासणी केली गेली.

खासगी दवाखाने आणि पालिकेचे दवाखाने सुरू केले गेले. तज्ञ खासगी डॉक्टरांची मदत घेतली. सेवाभावी संस्थांना परिस्थितीचे गांभीर्य समजावून मोबाइल दवाखाने सुरू केले. धारावीतील तब्बल पाच लाख ४८ हजार ९७० नागरिकांची  वैद्यकीय तपासणी करण्यात आली. अहोरात्र मेहनत घेवुन 'कोरोनामुक्त धारावी पॅटर्न' राबवला गेला. त्याचाच परिणाम म्हणजे धारावीतील कमी होत असलेली रुग्णसंख्या. रूग्ण संख्या कमी झाल्याने दोन संस्थात्मक विलगीकरण केंद्रे बंद करण्यात आली आहेत. या केंद्रांमधील साधनसामग्री दादर आणि माहीम येथील केंद्रांसाठी वापरण्यात येत आहे.

पालिका, पोलिस यंत्रणा व राज्य सरकारच्या प्रत्येक आवाहनाचे स्थानिकांनी तंतोतंत पालन केल्याने आजचा दिवस उजाडला असल्याचे चित्र आहे. अहोरात्र पालिकेचे अधिकारी, पोलीस अधिकारी व त्यांच्या टीमने झोकून दिले होते त्यास धाराविकर मनापासून सलाम करत आहे.

पालिकेच्या नियोजनाचे आणि जिद्दीचे सर्वत्र कोतुक होत आहे. "शाब्बाश धारावी.."

सुरवातीपासूनच आम्ही लोकांना कोरोना ची माहिती देण्यावर भर दिला तसेच 2 लाख मास्क 1 लाख सॅनिटायझर चे गरीब व गरजू रहिवाशांना वाटप केले. लोकांनी स्वच्छतेविषयी जागरूक राहावे यासाठी जनजागृती केली. लोकांच्या व पोलिसांच्या सहकार्याने आज धारावी कोरोना मुक्त होत आहे. असं धारावीतील वरिष्ठ पोलीस रमेश नांगरे यांनी सांगितलं. 

घरोघरी जाऊन रहिवाशांची तपासणी करण्यात आली. कोरोना तपासणीसाठी  धारावीतील विविध ठिकाणी आरोग्य शिबीरांचे आयोजन केले. ट्रेसिंग, चाचणी, ट्रॅकिंग व उपचार या चतुसूत्रीचा वापर केल्याने धारावीत रुग्ण संख्या घटण्यास व मृत्यू रोखण्यासाठी मदत झाली. सार्वजनिक शौचालय स्वच्छतेकडे मोठ्या प्रमाणावर लक्ष केंद्रित केले गेले होते.असं  G नॉर्थ भागातील सहाय्य्क मनपा आयुक्त किरण दिघावकर यांनी म्हटलंय. 

सुरवातीला आम्ही धारावीकर निर्धास्त होतो. मात्र जसजसे कोरोना रुग्णांची धारावीत वाढ होऊ लागली तशी परिस्थिती बदलली व सरकारी यंत्रणेच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यास सुरुवात झाली. यामुळे परिस्थितीत फरक पडला आहे. सर्व योद्धांना सलाम. असं इथले स्थानिक रहिवासी शंकर खिल्लारे म्हणालेत. 

good news coming from mumbais dharavi covid patient count dropped

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com