मुंबईकरांना लागली पावसाची ओढ! आयएमडीने दिली ही आनंदाची बातमी

मुंबईकरांना लागली पावसाची ओढ! आयएमडीने दिली ही आनंदाची बातमी

मुंबई- काही दिवसांपासून दडी मारुन बसलेला पाऊस मुंबईत काही ठिकाणी पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. 28 जूनपासून मुंबईत पुन्हा पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. गुरुवारी भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) याबाबतची माहिती दिली. 18 जूनला शहरात शेवटचा जोरदार पाऊस झाला होता. गेल्या चार दिवसांपासून शहरात अद्याप पावसाची नोंद झालेली नाही.

आयएमडीनं वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढच्या चार दिवसात शहर आणि मुंबई महानगर प्रदेशात हलक्या ते अगदी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत 18 जूनला फक्त एकदाच जोरदार पावसाची नोंद झाली. त्यावेळी उपनगरामध्ये 41 मिमी आणि दक्षिण मुंबईत 44 मिमी पाऊस पडला.

1 जूनपासून आतापर्यंत 309.2 मिमी एकूण पावसाची नोंद आहे, जी मासिक सरासरीपेक्षा 71.3 मिमी आहे. 28 जूनपासून पाऊस पुन्हा सुरू होण्याची शक्यता असून जुलैच्या पहिल्या आठवड्यात त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

18 जूनपासून मुंबईसह महाराष्ट्रात सखोल भागासाठी पावसासंबंधी कोणत्याही प्रकारचा महत्त्वाचा बदल दिसून आला नाही. जून-अखेरपासून राज्यात पाऊस पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे आणि त्यामुळे जुलैच्या सुरुवातीला चांगला पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामानशास्त्रज्ञ आणि युनिर्व्हसिटी ऑफ रिडिंग, युनायटेड किंगडम (यूके)  हवामानशास्त्र विभागातील पीएचडी संशोधक अक्षय देवरस यांनी वर्तवला आहे.

दरम्यान, उपनगरामध्ये कमाल तपमान 33.7 डिग्री सेल्सियस नोंदविण्यात आले, जे सामान्यपेक्षा दोन अंशांपेक्षा जास्त होते, तर किमान तापमान 26.9 अंश सेल्सियस होते, जे सामान्यपेक्षा एक डिग्री अधिक आहे.

असा असेल यंदाचा पाऊस, हवामान विभागाचा अंदाज 

यावर्षी सरासरी इतका पाऊस पडणार असून जून ते सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या 96 ते 100 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. एप्रिल महिन्यात आयएमडीने यंदाच्या मान्सूनबाबत पहिला अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार यंदा मान्सून सामान्य राहणार आहे. यंदा पाऊस सरासरीच्या 100 टक्के पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com