कोरोनाची अनोखी कहाणी : वडिलांचे प्राण गेलेत म्हणून त्यांनी ठरवलं आता 'ते' औषध मोफत वाटायचं, यातून वाचलेत २५ जणांचे प्राण...

कोरोनाची अनोखी कहाणी : वडिलांचे प्राण गेलेत म्हणून त्यांनी ठरवलं आता 'ते' औषध मोफत वाटायचं, यातून वाचलेत २५ जणांचे प्राण...

मुंबई : मुंबईत अजूनही कोरोना रुग्ण डिटेक्ट होण्याचं प्रमाण वाढतानाच पाहायला मिळतंय. अशात मुंबई महापालिकेकडून कोरोनाला रोखण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न केले जातायत. कोरोनावर जगभरात वापरली जाणारी विविध औषधं मुंबईतल्या रुग्णांवर वापरून लवकारात लवकर मुंबईतून कोरोनाला हद्दपार करण्याचा BMC चा प्रयत्न आहे. अशात सध्या मुंबईत 'रेमेडिसिवीर' या औषधाचा वापर केला जातोय. या औषधामुळे कोरोना रुग्ण बरे होताना पाहायला मिळतायत. कोरोनाचं एक रामबाण औषध म्हणून  'रेमडेसिवीर'कडे पाहिलं जातंय. मात्र हे औषध भारतात तात्काळ उपलब्ध होण्यास अडचणी येतायत. 

याच औषधामुळे मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टर, डॉ. जलील पारकर यांनी कोरोनावर मात केलीये. मात्र डॉक्टर पारकर यांना 'रेमडेसिवीर' हे औषध मिळणं आणि त्यांचं कोरोनमुक्त होणं यामागे एक मोठी स्टोरी आहे. मुंबईतीलच एका व्यक्तीने डॉक्टरांच्या उपचारासाठी हे औषध देऊ केलंय. डॉक्टर पारकर यांनी आतापर्यंत शेकडो कोरोना रुग्णांवर उपचार केलेत. मात्र अनेक रुग्णांवर उपचार करताना स्वतः डॉक्टर पारकर यांना कोरोनाची लागण झाली. त्यांना ICU मध्येही ऍडमिट करण्यात आलं होतं. योग्य वेळी  'रेमडेसिवीर' औषध मिळाल्याने डॉक्टर बरे होऊ शकले. 

ज्या व्यक्तीने डॉक्टर पारकर यांच्यासाठी 'रेमडेसिवीर' औषध देऊ केलं त्या व्यक्तीच्या वडिलांना कोरोना झाला होता. डॉक्टर पारकर हेच त्यांच्यावर उपचार करत होते. मात्र योग्य वेळी त्यांना 'रेमडेसिवीर' औषध मिळालं असतं तर कदाचित  त्यांचे प्राण वाचले असते. मात्र तसं न झाल्याने या व्यक्तीच्या वडिलांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागलेत. आपल्या वडिलांना प्राण गमवावे लागले, मात्र इतर कुणाला औषध वेळेवर मिळालं नाही म्हणून किंवा औषधच मिळालं नाही म्हणून प्राण गमवावे लागू नये म्हणून या व्यक्तीने अनेक गरजुंना 'रेमडेसिवीर' हे औषध फ्री वाटायचा निर्णय घेतलाय.

कोरोना व्हायरसवर रामबाण ठरणाऱ्या 'रेमडेसिवीर' या औषधाच्या भारतातील उत्पादनाला सरकारने परवानगी दिली आहे. सध्या 'रेमडेसिवीर' हे औषध बांग्लादेशमधून मागवता येतंय. सदर व्यक्ती हेऔषध बांगलादेशातून मागवतो. हे औषध कोलकातामध्ये येतं आणि त्यानंतर ते मुंबईत येतं. या व्यक्तीने आतापर्यंत तब्बल पाच लाख रुपयांची औषधे बांगलादेशातून मागवली आहेत आणि गरजू लोकांना मोफत देत २५ लोकांचे  कोरोनापासून प्राण वाचवलेत. 'रेमडेसिवीर' या औषदाच्या एका बाटलीची बांगलादेशातील किंमत ६५ डॉलर्स एवढी आहे. अमेरिका आणि युनायटेड किंगडममध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जातायत.  

man from mumbai is giving free medicine of remdesivir to needy people in the city

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com