esakal | कतारमध्ये शिक्षा भोगणाऱ्या मुंबईकर दांपत्यासाठी खुशखबर ! परतीच्या आशा पल्लवित

बोलून बातमी शोधा

कतारमध्ये शिक्षा भोगणाऱ्या मुंबईकर दांपत्यासाठी खुशखबर ! परतीच्या आशा पल्लवित}

मोहम्मद शरीक व त्याची पत्नी ओनिबा कौसर 2019 जुलै महिन्यात हनीमुनसाठी कतार येथे गेले होते.

कतारमध्ये शिक्षा भोगणाऱ्या मुंबईकर दांपत्यासाठी खुशखबर ! परतीच्या आशा पल्लवित
sakal_logo
By
अनिश पाटील

मुंबई : ड्रग्स तस्करीप्रकरणी कतारमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या मुंबईतील जोडप्यासाठी केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) परराष्ट्र विभागाच्या माध्यमांतून स्थानिक न्यायालयात पुन्हा सुनावणी घेण्याची मागणी केली होती. त्याला न्यायालयाने होकार दिला आहे. त्यामुळे या दांपत्याच्या परतीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यांच्या एका नातेवाईकाने त्यांना याप्रकरणी अडवले होते. त्याबाबतचे पुरावे एनसीबीच्या हाती लागले होते.

मोहम्मद शरीक व त्याची पत्नी ओनिबा कौसर 2019 जुलै महिन्यात हनीमुनसाठी कतार येथे गेले होते. त्यावेळी हमाद विमानतळावर त्यांच्याकडील बॅगेत चार किलो हशीश सापडली. ती बॅग शरिकच्या एका नातेवाईक महिलेने त्यांच्याकडे दिली होती. जलदगती न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याप्रकरणी ओनिबा यांचे वडील शकील कुरेशी यांनी शरीकची मावशी तब्बसूम कुरेशी व तिचा साथीदार निजाम कारा यांनी त्यांना याप्रकरणी अडकवल्याची तक्रार एनसीबीकडे केली होती.

महत्त्वाची बातमी : अमित शहांच्या टीकेनंतर अरविंद सावंत यांचा भाजपवर हल्लाबोल; शिवसेना-भाजप 50-50 च्या सूत्रावर केलं महत्त्वाचं भाष्य

हनीमुनसाठी आरोपींनी या दांपत्याला परदेशात पाठवले व त्यांना माहिती न देता त्यांच्या सामानात अंमली पदार्थ लपवले. यावेळी त्यांनी महत्त्वाचे पुरावे व संभाषण सादर केले आहे. आरोपी महिलेने जर्दा असल्याच्या नावाखाली त्यांच्या बॅगेत हशीश ठेवले होते. त्याप्रकरणी एनसीबीच्या तपासात कारा याने तबस्सूमच्या मदतीने हा सर्व प्रकार घडवून आणल्याचे स्पष्ट झाले. कारा व तबस्सूम दोघांनाही 2019 मुंबई पोलिसांना अटक केली होती.

त्याप्रकरणी आरोपींची जामिनावर सुटका झाल्यानंतर नुकतीच दोघांना एनसीबीने अटक केली आहे. त्यावेळी चौकशीत आरोपींनी गुन्हा कबुल केला असून त्यांनी या दांपत्याच्या माहितीशिवाय त्यांचा वापर तस्करीसाठी केल्याचे सांगितले. त्यांना जर्दा असल्याचे सांगून हशीश देण्यात आले. याप्रकरणी आता एनसीबी सर्व पुरावे कतारच्या संबंधीत यंत्रणाना पाठवले असून त्याना या प्रकरणी नातेवाईकांना अडकवल्याची माहिती देण्यात आली.

VIDEO : रात्री दोन वाजल्यापासून एकामागून एक 12 स्फोट; मीरा रोड हादरलं भयंकर स्फोटांनी

एनसीबीचे महासंचालक राकेश अस्थाना यांनी मुंबईत येऊन या सर्व कार्यवाहीची पडताळणी करून परराष्ट्र विभागाच्या माध्यमातून न्यायालयीन लढा सुरू केला. त्याला यश आले असून कतारमधील याप्रकरणी नव्या पुराव्यांच्या आधारावर पुन्हा सुनावणी करण्याची मागणी नुकतीच मान्य केली आहे.

good news for couple arrested in dubai ministry of foreign affair connected with dubai embassy