esakal | SRA च्या विकासकांना दिलासा; प्रिमियम भरण्यासाठी मुदतवाढ
sakal

बोलून बातमी शोधा

Slum

SRA च्या विकासकांना दिलासा; प्रिमियम भरण्यासाठी मुदतवाढ

sakal_logo
By
तेजस वाघमारे

मुदतवाढीमुळे SRA प्रकल्पांना गती मिळणार असल्याचा प्रशासनाला विश्वास

मुंबई: झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला गती देण्यासाठी गृहनिर्माण विभागाने विकासकांना अधिमूल्य भरण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. एसआरए प्रकल्प ((Slum Rehabilitation Authority) राबविणाऱ्या विकासकांना 30 सप्टेंबरपर्यंत अधिमूल्य सवलतीचा लाभ घेता येणार आहे. यामुळे एसआरए (SRA) प्रकल्पांना गती मिळणार आहे. (Good News for SRA region developers as administration extends deadline to pay premium)

हेही वाचा: ITI प्रशिक्षणाला परवानगी पण लोकल प्रवासाची मुभा नाहीच!

झोपडपट्टीमुक्त मुंबई करण्यासाठी राज्य सरकारकडून झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यात येत आहे. नोटबंदी आणि त्यानंतर आलेल्या कोरोनामुळे जागतिक महामारीमुळे खाजगी विकासकांची आर्थिक स्थिती नाजूक झालेली आहे. त्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविणारे खाजगी विकासक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे एसआरए योजनेला गती देणे अवघड झाले आहे. एसआरएच्या तरतुदीनुसार प्रकल्पांच्या सुरुवातीलाच सुमारे 25 टक्के अधिमूल्य भरणे विकासकांना जड जात आहे.

हेही वाचा: परवानाधारक कत्तलखान्यांमध्येच प्राण्यांची कत्तल व्हावी- हायकोर्ट

प्रिमियमची रक्कम भरल्यानंतर विकासकांना योजनेला गती देण्यास अडचण येत आहे. त्यामुळे राज्य सरकारने सार्वजनिक मालकीच्या जमिनीवरील झोपड्यांचा पुनर्विकास खाजगी विकासकांकडून अधिमूल्य आकारणी करण्यास 31 मार्च पर्यंतची मुदत दिली होती. या नंतरही SRA योजनेला गती देण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यामुळे SRA च्या प्रकल्पांना पुन्हा वेग मिळणार आहे असं सांगण्यात येत आहे.

loading image