esakal | परवानाधारक कत्तलखान्यांमध्येच प्राण्यांची कत्तल व्हावी- हायकोर्ट
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai-High-Court-Bakri-Eid

परवानाधारक कत्तलखान्यांमध्येच प्राण्यांची कत्तल व्हावी- हायकोर्ट

sakal_logo
By
सुनीता महामुणकर

मुंबई उच्च न्यायालयाने ठाणे पालिकेला सुनावले खडे बोल

मुंबई: बकरी ईदनिमित्त अनेक परिसरात अवैध प्रकारे गुरांची कत्तल केली जात असल्याचे बोलले जाते. अशाच प्रकारची एक याचिका गौ ग्यान फाऊंडेशनतर्फे करण्यात आली होती. बकरी ईदनिमित्त ठाण्यातील मुंब्रा परिसरात अवैधरित्या गुरांची कत्तल होते, अशा आशयाची फौजदारी जनहित याचिका करण्यात आली. त्यावर निरिक्षण नोंदवताना, केवळ परवानाधारक कत्तलखान्यामध्येच प्राण्यांची कत्तल करायला हवी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. तसेच, अवैध प्रकारे होणाऱ्या प्राण्यांच्या कत्तल प्रकरणी खुलासा करण्याचे निर्देशही न्यायालयाने ठाणे महापालिकेला दिले.

हेही वाचा: "त्यात काय मोठा पराक्रम?"; राणेंचा ठाकरेंवर पुन्हा हल्लाबोल

'गौ ग्यान फाऊंडेशन'च्या वतीने करण्यात आलेल्या याचिकेवर न्या. एस एस शिंदे आणि न्या. एन जै जमादार यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. या अवैध कत्तलीची माहिती आम्ही ठाणे पोलिसांना दिली होती. मात्र त्याची दखल त्यांनी घेतली नाही, असा आरोप याचिकाकर्त्यांकडून करण्यात आला. त्यामुळे याबाबत पोलीस आयुक्तांनी खुलासा करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. तसेच परवाना असलेल्या कत्तलखान्यात महापालिकेच्या निर्धारित वेळेनुसार परवानगी द्यावी, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. पोलीस आणि पालिकेने पाहणी करून अहवाल सादर करावा, असे निर्देशही न्यायालयाने दिले.

हेही वाचा: "हे बा विठ्ठला, जसे मुख्यमंत्री तुझ्या भेटीला आले तसेच..."

लोकांच्या जीवापेक्षा धार्मिक सण महत्त्वाचे नाहीत- मुंबई हायकोर्ट

बकरी ईदनिमित्त कोरोनाकाळात महापालिकेने देवनारमध्ये कुर्बानीसाठी बनवलेली नियमावली ही योग्यच आहे. याचिकाकर्त्यांना कोणताही दिलासा देण्यात येणार नाही. मर्यादित संख्येपेक्षा जास्त जनावरांच्या कत्तलीस परवानगी नाकारली जात आहे. कारण लोकांच्या जीवापेक्षा धार्मिक सण महत्त्वाचे नाहीत, असे निरीक्षण हायकोर्टाने नोंदवले.

हेही वाचा: मुंबईसाठी दिलासादायक बाब; रुग्ण दुपटीचा कालावधी हजार दिवसांपार

BMC ची नियमावली

मुंबई पालिकेकडून बकरी ईदसाठी नियमावली जाहीर करण्यात आली. त्या नियमावलीनुसार, देवनार येथील कत्तलखाना हा बकरी ईदच्या कत्तलीच्या अनुषंगाने तीन दिवस सुरू ठेवण्यास पालिकेची परवानगी आहे. सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या वेळेत लहानमोठ्या जनावरांची कत्तल या कत्तलखान्यात करता येऊ शकते. त्यानंतर मात्र कत्तलीला परवानगी नसेल. तसेच, मुस्लिमांची शहरातील संख्या लक्षात घेता दिवसाला हजार जनावरांची कत्तल करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी मुस्लिम नागरिक करत होते. पण दिवसाला 300 मोठ्या जनावरांचीच कत्तल करण्यास पालिकेने परवानगी दिली आहे.

loading image