esakal | आनंदाची बातमी, मुंबईत तब्बल 'इतक्या' पोलिसांनी केली कोरोनावर मात
sakal

बोलून बातमी शोधा

आनंदाची बातमी, मुंबईत तब्बल 'इतक्या' पोलिसांनी केली कोरोनावर मात

मुंबईत गुरुवारी दिवसभरात तब्बल 1233 पोलिसांनी कोरोनावर मात केली. तर 334 पोलिस कर्मचारी हे पूर्णतः बरे होऊन ड्युटीवर रुजू झालेत. पोलिस उपायुक्त प्रणय अशोक यांनी यासंदर्भातली माहिती दिली. 

आनंदाची बातमी, मुंबईत तब्बल 'इतक्या' पोलिसांनी केली कोरोनावर मात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई- कोरोना व्हायरसनं सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न करताहेत. तसंच अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी अहोरात्र मेहनत घेताहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईत डॉक्टर्स, नर्सेस आणि पोलिस रस्त्यावर काम करत आहेत. आजूबाजूची परिस्थिती गंभीर असूनही पोलिस स्वतः चा जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहेत. त्यातच आनंदाची बातमी म्हणजे, मुंबईत गुरुवारी दिवसभरात तब्बल 1233 पोलिसांनी कोरोनावर मात केली. तर 334 पोलिस कर्मचारी हे पूर्णतः बरे होऊन ड्युटीवर रुजू झालेत. पोलिस उपायुक्त प्रणय अशोक यांनी यासंदर्भातली माहिती दिली. 

'निसर्ग'ग्रस्तांच्या मदत पॅकेजमध्ये अनेक त्रुटी; देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारवर आरोप

मुंबईत आतापर्यंत 2028 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यात 290 पोलिस अधिकारी 1738 पोलिस कर्मचाऱ्यांची नोंद आहे. मात्र यातील 516 जणांना क्वारनंटाईन करण्यात आलं. तर 224 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

33 जणांमध्ये अतिसौम्य लक्षणे आढळून आल्याने त्यांना घरीच क्वारंटाईन करण्यात आलंय. 335 पोलिस कर्मचाऱ्यांना घरी सोडण्यात आलेले आहे. तर ५६४ जणांनी कोरोनावर मात केली असली, तरी त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. 334 जणांनी कोरोनावर मात केली असून पुन्हा सेवेत हजर झालेत. पोलिसांनी याबाबतची माहिती दिली आहे. 

काय सांगता! 'पुलं'चं साहित्य आता त्यांच्याच हस्ताक्षरात वाचता येणार; ते कसे वाचा

कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे अंदाजे हजार पोलिसांना आयसोलेशन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे. तरी त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षण आढळून आलेली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. मुंबईत पोलिसांच्या मदतीला केंद्रीय पथके दाखल करण्यात आली आहेत. मात्र त्यातही 77 जवानांना कोरोनाची लागण झाली आहे.  तसेच 50 वयोगटावरील पोलिसांना कमी जोखीमीचे काम देण्यात येतंय. त्यामुळे पोलिसांच्या मदतीसाठी सध्या 10 हजार होमगार्ड, 1200 केंद्रीय सुरक्षा जवान देण्यात आलेत.

loading image