esakal | काय सांगता! 'पुलं'चं साहित्य आता त्यांच्याच हस्ताक्षरात वाचता येणार; ते कसे वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

काय सांगता! 'पुलं'चं साहित्य आता त्यांच्याच हस्ताक्षरात वाचता येणार; ते कसे वाचा
  • इंटरनेच्या महाजालात 'पुलं'च्या हस्ताक्षराची जादू  
  • पु.ल.देशपांडे यांच्या हस्ताक्षराच्या फॉन्टची निर्मिती ,
  • पुलंच्या स्मृति दिनी अनोखी भेट

काय सांगता! 'पुलं'चं साहित्य आता त्यांच्याच हस्ताक्षरात वाचता येणार; ते कसे वाचा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

 
मुंबई  ः महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु.ल.देशपांडे यांचे साहित्य आजही लोक आवडीने वाचतात. ग्रंथदालनात त्यांच्या पुस्तकांना कायम मागणी असते. लेखकांची ओळख ही त्याचे हस्ताक्षर असते. पुलंचे साहित्य त्यांच्या हस्ताक्षरात वाचाता आले तर तो आनंद काही वेगळाच असेल. पण आता पुलंच साहित्य त्यांच्याच हस्ताक्षरात वाचणे शक्य होणार आहे. 'बी बिरबल डॉट इन'ने पुलंच्या हस्ताक्षरातील फॉन्टची निर्मिती केली आहे. पुलंच्या स्मृती दिनी रसिकांना ही अनोखी भेट देण्यात आली आहे.

हॅशटॅग म्हणजे काय?

पुलच्या हस्ताक्षराच्या फॉन्टच्या निर्मिती संकल्पना कलाकार, बी बिरबल डॉट इनचे संचालक गंधार संगोराम यांची आहे. या  फॉन्ट निर्मितीबाबत गंधार म्हणाले,  चित्रकार आपल्या मागे चित्रे तर संगीतकार आपल्या मागे संगीत सोडून जातो पण लेखक जरी त्यांचे लिखाण मागे सोडून जात असला तरी त्याचे हस्ताक्षर ही त्याची कला असते. त्याच्या हस्ताक्षरामधून त्याच्या विषयी खूप काही कळू शकते. दोन वर्षापूर्वी  पुलंच्या हस्ताक्षराचा फॉन्ट करायचे डोक्यात आले. मग ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याासाठी काम सुरू केले इंटरनेट द्वारे खूप प्रयत्न केले, सॉफ्टवेअर डाऊनलोड करुन त्यावर प्रयोग केले. सुमारे सहा महिने प्रयत्न केले. परंतु यश आले नाही. मग फॉन्ट डिझायनर सोबत घेऊन काम करायचे ठरवे. त्यासाठी किमया गांधी फॉन्ट डिझायनरशी संपर्क केला. किमया यांनी यापूर्वी देवनागरी फॉन्ट तयार केले होते.  त्याच्याकडून पुलंच्या हस्ताक्षरातील फॉन्ट डिझाईन करून घेतला, असे गंधार यांनी सांगितले. 

रोज काम केल्याशिवाय पोटाला मिळत नाही!... कथा 'त्या' माऊलीच्या संघर्षाची

फॉन्ट तयार झाल्या तरी त्यांच्या तांत्रिक अडचणी येत होत्या. त्याची चाचणी करण्यासाठी काहींना हा फॉन्ट वापरण्यासाठी दिला. त्यामध्ये आलेल्या अडचणी दूर करण्यासाठी त्यावर काम करण्यात आले. खर तर रोमन किंवा इंग्रजी फॉन्टपेक्षा  मराठी फॉन्ट तयार करणे  कठिण असते. त्यामध्ये जोडाक्षर , काना , मात्रा असते. हे बारकावे लक्षात घेऊन फॉन्ट अखेर तयार झाला.  12 जून पुलंच्या स्मृतीदिनी हा फॉन्ट बी बिरबल या संकेतस्थळावर सर्वांसाठी प्रकाशित करण्यात येत आहे, अशी माहिती गंधार संगोराम यांनी दिली. 
https://bebirbal.in/pula100/ या लिंकवरून हा फॉन्ट फ्रीमध्ये डाऊनलोड करता येईल. मराठी साहित्या क्षेत्रात लेखकाच्या हस्ताक्षराच्या फॉन्टची निर्मिती असा पहिल्यांदाच प्रयोग करण्यात आला. हा प्रयोग महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पुलं यांच्या हस्ताक्षरातून करण्यात येत आहे. पुलंच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांना ही दिलेली मानवंदना आहे. एवढ्या मोठ्या लेखकाच्या हस्ताक्षर इंटरनेटच्या महाजालात उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्या लेखकाची थोरवी रसिकांनी कायम जपावी. त्याचा दुरूपयोग होता कामा नये अशी अपेक्षा गंधार यांनी व्यक्त केली. 

मुंबईकरांनो राज्यात मान्सून दाखल झालाय, पण मुंबईत कधी दाखल होणार जाणून घ्या...

पु.ल.देशपांडे एवढे मोठे व्यक्तीमत्त्व आपल्या राज्यात होऊन गेले. सुमारे 12 कोटी  मराठी बोलणाऱ्या लोकांना साहित्य क्षेत्रातील एवढ मोठं व्यक्तिमत्त्व कायम स्मरणात राहवे. यासाठी त्यांचे हस्ताक्षर अमर करुन त्याचे काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता यावे, हाच या फॉन्ट निर्मितीमागील हेतू आहे  - गंधार संगोराम , संचालक, , बी बिरबल डॉट इन

loading image
go to top