'निसर्ग'ग्रस्तांच्या मदत पॅकेजमध्ये अनेक त्रुटी; देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारवर आरोप

devendra fadanvis
devendra fadanvis

मुंबई:  निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांपर्यंत प्रशासन अद्याप पोहचलेले नाही. तसेच, राज्य सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये अनेक त्रुटी आहेत, असा आरोप करत कोकणातील मच्छीमार, बागायतदार, पर्यटन व्यावसायिक सावरू शकणार नाही, अशी खंत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगड जिल्ह्याच्या पाहणी दौऱ्यात व्यक्त केली आहे. 

देवेंद्र फडवणीस यांनी मांडवा येथून दौऱ्याला सुरुवात केली. अलिबाग, रेवदंडा, काशिद, मुरूड येथे पाहणी करून त्यांनी म्हसळा, श्रीवर्धन तालुक्याचा दौरा केला. यामध्ये त्यांनी अनेक नुकसानग्रस्त नागरिकांशी संवाद साधला. 

चक्रीवादळ शांत होऊन आज नऊ दिवस झाले, तरी येथील नागरिकांना वीज, पाणी आणि आरोग्य अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने पिण्याचे पाणी, मोबाईल सेवा खंडित झाली आहे. प्रशासन अद्याप नुकसानग्रस्तांपर्यंत पोहचू शकलेले नाही. वर्षभरातील हे तिसरे आणि सर्वांत मोठे चक्रीवादळ आहे. यात बाधित झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे.

कोकणातील शेतकऱ्यांकडे दरडोई जमिनीचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे दर हेक्टरी 50 हजार रुपये नुकसानभरपाईचे पॅकेज येथील परिस्थितीस लागू होत नाही. बागांचे नुकसान किमान 10 वर्षे भरून काढणे शक्य नाही. भविष्याचा विचार करून मदत मिळणे गरजेचे आहे, असे फडणवीस यांनी श्रीवर्धन- जीवनाबंदर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

रायगडमधील अर्थव्यवस्था पर्यटन क्षेत्रावर अवलंबून आहे.  सरकारने या व्यवसायाशी संबंधित असणाऱ्यांना दिलासा देण्याची गरज असल्याचे मत त्यांनी या वेळी व्यक्त केली. याप्रसंगी त्यांच्यासमवेत विधान परिदषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, दक्षिण जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते व पदाधिकारी उपस्थित होते.

धर्माधिकारी कुटुंबीयांची सदिच्छा भेट:

नुकसानग्रस्तांच्या पाहणी दौऱ्यात फडणवीस यांनी ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांची चौल येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. त्याप्रसंगी निरूपणकार सचिन धर्माधिकारी व धर्माधिकारी कुटुंबीय उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. 

नागरिकांचे लेखी निवेदन:

चक्रीवादळात बेलोशी व चिंचोटीमधील कुक्कुटपालन व्यवसाय जमीनदोस्त झाला आहे. यासाठी आम्हाला मदतीची प्रतीक्षा आहे, असे लेखी निवेदन पाच कुक्कुटपालन व्यावसायिकांनी फडणवीस यांना दिले. तर चौलमधील विश्वास जोशी यांनी वादळात झालेल्या झाडांची योग्य ती नुकसान भरपाई मिळावी, तसेच कोरोनामुळे पर्यटन व्यवसाय ठप्प झाला आहे. अनेकांचा यामुळे रोजगारही बुडाला आहे, या संदर्भात फडणवीस यांच्याकडे निवेदन सादर केले.

many errors are in state governments package said fadanvis 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com