पीएमसी बँक ठेवीदारांसाठी खूशखबर; रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण आल्याने पैसे मिळण्याची अपेक्षा

कृष्ण जोशी
Thursday, 17 September 2020

बँकिंग रेग्युलेशन अॅक्टमध्ये बुधवारी (ता. 16) लोकसभेत झालेल्या दुरुस्तीमुळे पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेच्या ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळण्याची आशा निर्माण झाली आहे, असे पीएमसी डिपॉझिटर्स फोरमचे अध्यक्ष चंदर पुरसवानी यांनी सांगितले. 

मुंबई : बँकिंग रेग्युलेशन अॅक्टमध्ये बुधवारी (ता. 16) लोकसभेत झालेल्या दुरुस्तीमुळे पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेच्या ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळण्याची आशा निर्माण झाली आहे, असे पीएमसी डिपॉझिटर्स फोरमचे अध्यक्ष चंदर पुरसवानी यांनी सांगितले. 

अर्थव्यवस्थेला अद्यापही कोरोनाचा धोका; वाढ मंदगतीनेच होणार; रिझर्व्ह बँक गव्हर्नर दास यांचे मत

पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेचे सव्वानऊ लाख ठेवीदार असून, मध्यंतरी झालेल्या गैरप्रकारांमुळे त्यांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवर 2019 मध्ये निर्बंध घातल्यावर ठेवीदारांना पैसे काढता न आल्याने त्यांचे हाल झाले. आतापर्यंत 63 ठेवीदार मृत्युमुखी पडले असून, तीन ठेवीदारांनी तणावामुळे आत्महत्या केली आहे. या संदर्भात पंतप्रधानांनीच लक्ष घालावे, अशी मागणी पुरसवानी यांनी केली होती. 

मराठा आरक्षण : सर्वपाक्षीय बैठकीत उद्धव ठाकरेंनी मांडलेल्या गोष्टी आणि फडणवीसांनी मांडलेले मुद्दे

आता कायद्यात केलेल्या दुरुस्तीमुळे रिझर्व्ह बँकेचे सर्वच बँकांवर नियंत्रण येणार आहे. विशेषतः सहकारी बँकांवरही रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण येणार असल्याने ठेवीदारांच्या आशा पल्लवीत झाल्याचे ते म्हणाले. आता सहकारी बँकेचे नियंत्रकही रिझर्व्ह बँक राहणार असल्याने यापुढे पीएमसी बँकेचे काय करायचे, याचा निर्णयही रिझर्व्ह बँकच घेईल. आता पीएमसी बँक इतर चांगल्या बँकेत विलीन करावी का?, तिची पुनर्रचना करावी का?, हे रिझर्व्ह बँकच पाहणार आहे. त्यामुळे पीएमसी बँकेच्या ठेवीदारांचे पैसेही परत मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्याचेही पुरसवानी म्हणाले.

-------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good news for PMC Bank depositors