प्राध्यापकांसाठी खुशखबर! 100 टक्के उपस्थितीवरून उच्च व तंत्रशिक्षण विभागाची माघार; ऑनलाईन उपस्थितीला मान्यता

तेजस वाघमारे
Tuesday, 22 September 2020

उच्च व तंत्रशिक्षण विभागाने  माघार घेत प्राध्यापकांच्या आवश्यकतेनुसार ऑनलाईन व प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची मुभा दिली आहे.

मुंबई : अंतिम वर्ष परीक्षेच्या कामकाजासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने 100 टक्के प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना महाविद्यालयांत उपस्थित  बंधनकारक केले होते. या निर्णयाला शिक्षक संघटनांनी कडाडून  विरोध करताच उच्च व तंत्रशिक्षण विभागाने  माघार घेत प्राध्यापकांच्या आवश्यकतेनुसार ऑनलाईन व प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची मुभा दिली आहे.

सप्टेंबरमध्ये पोलिसांवर कोरोनाचा मोठा आघात; अवघ्या 21 दिवसांत 66 जणांचा मृत्यू  

अंतिम वर्षाची परीक्षेची तयारी आणि निकाल वेळेत लावण्यासाठी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना महाविद्यालयांत 100 टक्के हजेरी लावण्याचे आदेश उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दिले आहेत. मात्र कोरोनाच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांची सुरक्षा लक्षात घेत प्राध्यापक संघटनांनी शिक्षकांच्या 100 टक्के उपस्थितीला विरोध दर्शवला आहे. शिक्षकांनी केलेल्या या विरोधाची दखल घेत उपस्थितीबाबत सरकारने स्पष्टीकरण सादर केले आहे. यामध्ये परीक्षा व परीक्षेच्या कामकाजाशी संबंधित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांची उपस्थिती आवश्यक असली तरी आवश्यकतेनुसार ही उपस्थिती प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन असणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.

खासगीत पॉझिटिव्ह अन सरकारी रुग्णालयात निगेटिव्ह; विश्वास कोणत्या अहवालावर ठेवायचा? रुग्णासमोर प्रश्न

परीक्षा किंवा परीक्षेशी संबंधित कामकाजाचा खोळंबा होऊ नये म्हणून विद्यापीठ किंवा महाविद्यालयांनी उपस्थितीसंदर्भात आपल्या स्तरावर गरजेनुसार निर्णय घ्यावा, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण विभागाने विद्यापीठ व कॉलेजांना केल्या आहेत. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये सुरू होणार्‍या अंतिम सत्राच्या परीक्षेवेळी शिक्षकांना ऑनलाईनही उपस्थित राहण्याची मुभा मिळाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन मुभा मिळाल्याने शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.

------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good news for professors Withdrawal of Higher and Technical Education Department from 100 per cent attendance