इलेक्‍ट्रिक ‘बेस्ट’ बसचा प्रवास गारेगार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

शीव ते मुलुंडदरम्यान बेस्ट उपक्रमाची इलेक्‍ट्रिक बस मंगळवारपासून धावू लागली. एसी बसमधून गारेगार प्रवासाचा मुंबईकरांनी मनमुराद आनंद लुटला... 

मुंबई : शीव ते मुलुंडदरम्यान बेस्ट उपक्रमाची इलेक्‍ट्रिक बस मंगळवारपासून (ता. १०) धावू लागली. एसी बसमधून गारेगार प्रवासाचा मुंबईकरांनी मनमुराद आनंद लुटला. वातानुकूलित बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
 
बेस्टच्या ताफ्यात समाविष्ट झालेल्या दहापैकी भाडेतत्त्वावरील पहिली बस मंगळवारी शीव ते मुलुंड मार्गावर धावली. राणी लक्ष्मीबाई चौक ते महाराणा प्रताप चौकदरम्यान वातानुकूलित आणि विनावातानुकूलित अशा दोन्ही प्रकारच्या गाड्या धावणार आहेत. सोमवार ते शनिवार आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशी कंत्राटदारामार्फतच्या गाड्या धावणार आहेत. रविवारी बेस्ट उपक्रमाच्या गाड्या या मार्गावर धावतील.

राणी लक्ष्मीबाई चौकातून पहिली वातानुकूलित बस पहाटे ५ वाजता सुटेल. शेवटची बस रात्री ११.१० वाजता सुटेल. विनावातानुकूलित पहिली बस ५.२५ वाजता तर शेवटची बस रात्री १०.४० वाजता सुटेल. महाराणा प्रताप चौकातून वातानुकूलित पहिली बस सकाळी ६.१५ व शेवटची बस रात्री १२.३५ वाजता सुटेल.  
भाडेही कमी
विनावातानुकूलित पहिली बस सकाळी ६.४५ वाजता आणि शेवटची बस रात्री १२.१० वाजता सुटेल. एसी बस किमान भाड्यात प्रवाशांच्या सोयीसाठी उपलब्ध झाल्याने  चांगला प्रतिसाद मिळत आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: good response by passenger to best's electric bus