esakal | त्याने बिस्कीटच्या आमिषाने तिला घरात नेलं, आणि...
sakal

बोलून बातमी शोधा

त्याने बिस्कीटच्या आमिषाने तिला घरात नेलं, आणि...

शेजारी राहणाऱ्या पाच वर्षीय मुलीसोबत अश्‍लील चाळे केल्याप्रकरणी अशोक उर्फ मामा नामदेव घोडेकर (49) याला ठाणे येथील सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. बी. बहाळकर यांनी पाच वर्षे कारावास व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

त्याने बिस्कीटच्या आमिषाने तिला घरात नेलं, आणि...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : शेजारी राहणाऱ्या पाच वर्षीय मुलीसोबत अश्‍लील चाळे केल्याप्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी विनयभंगासह पोक्‍सो कलमाखाली अशोक उर्फ मामा नामदेव घोडेकर (49) याला अटक केली होती. या आरोपीला ठाणे येथील सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. बी. बहाळकर यांनी पाच वर्षे कारावास व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. मे 2016 मध्ये ही घटना तुर्भे नाका येथील हनुमान नगर येथे घडली होती. 

ही बातमी वाचली का? मिरा रोडवरील युवक चीनमध्ये बंदिस्त

आरोपी अशोक उर्फ मामा नामदेव घोडेकर तुर्भे नाका येथील हनुमान नगरमध्ये पीडित मुलीच्या शेजारी राहण्यास होता. 27 मे 2016 रोजी सायंकाळी पीडित मुलगी आपल्या घरासमोर खेळत असताना घोडेकर याने पीडित मुलीला बिस्कीटचे आमिष दाखवून, तिला आपल्या घरामध्ये नेले. त्यानंतर त्याने पीडित मुलीसोबत अश्‍लील व लैंगिक चाळे केले होते. 

ही बातमी वाचली का? ठाण्यात लेक सिटी मॉलला आग

मुलीने घडल्या प्रकाराची माहिती आपल्या आईला सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मुलीच्या आईने आरोपी अशोक घोडेकर याच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी आरोपी अशोक घोडेकर याच्यावर विनयभंगासह पोक्‍सो कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. पोलिसांनी आरोपी विरोधात ठाणे येथील विशेष सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. 

ही बातमी वाचली का? वाहने उभी करण्यावरून दोन गटात हाणामारी

या खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्या. एस. बी. बहाळकर यांनी गुरुवारी (ता.13) आरोपी घोडेकर याला दोषी ठरविले. त्यानंतर त्याला कलम 354(ब) मध्ये 3 वर्षे व 3 हजार रुपये दंड; तर पोक्‍सो कलमामध्ये 5 वर्षे शिक्षा व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. 

loading image