Goregaon Fire
Goregaon FireSakal

Fire : गोरेगावमध्ये एकाच दिवसात दोन आगीच्या घटना; २५ वा आणि २६ वा मजला आगीच्या भक्ष्यस्थानी

गोरेगाव पश्चिमेकडील गोविंद जी श्रॉफ मार्गावरील २७ मजली ‘इनमोल प्राईड’ इमारतीला भीषण आग लागल्याची घटना बुधवारी घडली.

मुंबई - गोरेगाव पश्चिमेकडील गोविंद जी श्रॉफ मार्गावरील २७ मजली ‘इनमोल प्राईड’ इमारतीला भीषण आग लागल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. इमारतीच्या २६ व्या मजल्यावर ही आग लागली. ही आग विझविण्याचे काम सुरू असतानाच दुसरीकडे गोरेगाव राम मंदिर परिसरातील अस्मी औद्योगिक संकुलात रात्री आठच्या सुमारास आग लागली. या दोन्ही आगींना ‘टू लेव्हल फायर’ घोषित करून युद्धपातळीवर त्या विझविण्याचे प्रयत्न सुरू झाले.

जोरदार वाऱ्यामुळे ‘इनमोल प्राईड’ इमारतीचा संपूर्ण २५ वा आणि २६ वा मजला आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. या जाळपोळीत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. इमारतीची अग्निशमन यंत्रणा काम करत नसल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले. अग्निशमन दलाचे जवान रात्री उशिरापर्यंत २६ व्या मजल्यावर लागलेली आग पंप आणि शिडीच्या सहाय्याने विझविण्याचा प्रयत्न करत होते.

या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या ७ गाड्या तैनात करण्यात आल्या आहेत. दुसऱ्या घटनेतील अस्मी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्सच्या गोदामात मोठ्या प्रमाणात डिझेलचा साठा होता. भंगार साहित्य व काच साहित्य ठेवल्याने आगीने रौंद्ररुप धारण केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com