मुंबईकरांचा प्रवासाचा वेळ अर्ध्याहून कमी होणार; गोरेगाव-मुलुंड बोगद्याच्या कामाला वेग, प्रकल्पाबाबत नवी अपडेट समोर

Goregaon-Mulund Link Road project : गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्याच्या कामाबाबत नवी अपडेट समोर आली आहे. हा प्रकल्प वेगाने सुरु असून दुहेरी भूमिगत बोगद्यांच्या खोदकामाला एकाच वेळी सुरुवात झाली आहे.
Goregaon-Mulund Link Road project

Goregaon-Mulund Link Road project

ESakal

Updated on: 

मुंबई : मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील अंतर कमी करणाऱ्या गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्याच्या कामाने आता वेग घेतला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या दुहेरी भूमिगत बोगद्यांच्या खोदकामाला एकाच वेळी सुरुवात झाली असून, 'तुळशी' आणि 'विहार' ही दोन अत्याधुनिक यंत्रे कामाला लागली आहेत. पहिल्या यंत्राने २७० मीटरचा टप्पा पार केला असून, दुसऱ्या यंत्रानेही खोदकाम सुरू केले आहे. त्यामुळे गोरेगाव-मुलुंड प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.

Loading content, please wait...