

Goregaon-Mulund Link Road Project
ESakal
मुंबई : मुंबईत महापालिकेकडून गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचं काम सुरू आहे. हा प्रकल्प वर्सोवा-दहिसर कोस्टल रोडशीही जोडण्यात येणार आहे. यामुळे मुंबई, पश्चिम उपगनरांसह ठाणे परिसरातील वाहतूक कोंडी कमी होणार असून नागरिकांचा प्रवास अधिकच सुसाट होणार आहे. नुकतेच या बोगद्यांसाठी लॉन्चिंग शाफ्ट तयार झाल्याची माहिती समोर आली हाती. त्यानंतर आता या प्रकल्पाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.