blood thinner tablet
blood thinner tablet

Big News - कोरोनाबाधितांच्या रक्तात होतायत गुठळ्या, सरकारनं दिली 'या' उपचार पद्धतीचा वापर करण्याची परवानगी

मुंबई: कोविड-19 बाधित रुग्णांच्या रक्तात गुठळ्या होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे रुग्णाच्या जीवास धोका देखील निर्माण होत असल्याचे समोर आले आहे. मात्र आता यावर उपाय म्हणून सरकारनं एका उपचार पद्धतीचा आणि त्यासंबंधीच्या औषधांचा वापर करण्याला परवानगी दिली आहे. 

राज्य आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी याबाबत एक परिपत्रक ही काढले आहे. त्या नुसार कोविड 19 रुग्णांच्या मृत्यूमागील सर्वात महत्वाचे कारण म्हणजे रक्तातील गुठळ्यामुळे रक्त पुरवठयास अडथळा निर्माण होणे हे आहे. अश्या रुग्णांच्या उपचारासाठी रक्तात होणाऱ्या गुठळ्या थांबवणाऱ्या 'हेपरिन' औषधांचा वापर करण्यास सुचवण्यात आला आहे. तसंच रुग्णांना "ब्लड थिनर" म्हणजेच रक्तातील गुठळ्या काढणाऱ्या औषधांचा वापर करून उपचार करण्याची परवानगी दिली. 

याबाबतचे परिपत्रक सर्व पालिका आयुक्त,जिल्हा आरोग्य विभाग आणि वैद्यकीय महाविद्यालयांना पाठवण्यात आले आहे. रुग्णाला देण्यात येणारे उपचार किंवा रोग प्रतिबंधक औषधांमध्ये हेपरिन चे प्रमाण राज्य स्तरीय तज्ञ समितीने ठरवून दिल्या प्रमाणेच असावे असे स्पष्ट करण्यात आले आहे.

कोविड-19 रुग्णांमध्ये एकूण अवयव निकामी होण्याची समस्या असल्याचे ही समोर आले आहे. ही समस्याच असली तरी रुग्णांमध्ये उपचारादरम्यान रक्तात किंवा हृदयात गुठळ्या होत असल्याचे ही दिसते.

कोविड-19 मुळे एकूण झालेल्या मृत्यू पैकी ७० टक्के मृत्यू हे रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या झाल्याने होत आहेत. त्यामुळे फुफ्फुस किंवा रक्तवाहिन्यांमध्ये होणाऱ्या गुठळ्या थांबवणाऱ्या औषधांचा वापर करणाऱ्या हेपरीन औषधांचा वापर महत्वाचा आहे.

कोविड -19 ची प्राथमिक लक्षणे असणारा रुग्ण किंवा दीर्घकालीन आजार असणाऱ्या रुग्णांना योग्य प्रमाणात हेपरिन औषधे देण्यावर देखील परिपत्रकात भर देण्यात आला आहे. प्रत्येक प्रकरणात रुग्णाच्या सुरक्षेवर अधिक भर देण्यात येत असल्याचे स्टेट टास्क फोर्स मधील एका वरिष्ठ सदस्याने सांगितले. जगभरातील कोविड रुग्णांमध्ये अश्या प्रकारची समस्या असल्याचे समोर आले असून त्याची माहिती वरिष्ठ पातळीवर देण्यात आल्याचे टास्क फोर्स मधील एका सदस्याने सांगितले. त्यामुळेच पालिकेकडून सुरुवातीला कोविड-19 रुग्णांसह रुग्णांच्या संपर्कातील अति जोखमीच्या व्यक्तींना त्यांची  रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हायड्रोक्लोरोक्वीनच्या गोळ्या देण्याचा ही निर्णय झाला होता.

त्यामुळे आता सरकारनं या उपचार पद्धतीचा वापर करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना याचा फायदा होणार आहे. 

governemt gave permission for treatment of corona patients have blood cloting in their blood read full story 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com