

Sanjay Gandhi National Park
ESakal
मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील (एसजीएनपी) आदिवासी आणि पात्र अतिक्रमणकर्त्या कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली २०३४मधील नियम ३४मध्ये सुधारणा करून ना-विकास विभागातील (एनडीझेड) जमिनींवर पुनर्वसनास परवानगी देणारी तरतूद शासनाने मंजूर केली आहे. याबाबतची अधिसूचना शुक्रवारी (ता. १२) नगरविकास विभागाने जारी केली आहे.