लॉकडाऊनच्या काळात 'मापात पाप', इतके खटले झालेत दाखल... 

लॉकडाऊनच्या काळात 'मापात पाप', इतके खटले झालेत दाखल... 

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात रेशन दुकानांमार्फत सरकारने गरजूंना धान्य देण्यात येत आहे. पण अशा संकट काळातही मापात पाप करणा-या 80 शिधावाटप केंद्र व स्वस्त धान्य दुकानांविरोधात कारवाई करण्यात आली. वैध मापन शास्त्र विभागाने आतापर्यंत राज्यातील 886 शिधावाटप व स्वस्त धान्य दुकानांची तपासणी केली असून याप्रकरणी 80 खटले दाखल केले आहेत.

राज्य सरकारच्या वतीने सध्या जीवनावश्यक वस्तूंचे वितरण शिधावाटप केंद्र व स्वस्त धान्य दुकांनांमार्फत करण्यात येत आहेत. government  filed cases against 80 ration shop owners for giving lesser quantitygovernment  filed cases against 80 ration shop owners for giving lesser quantityकोरोनाच्या या संकटसमयी ग्राहकांना दुकानदाराकडून फसवले जाऊ नये, यासाठी राज्य वैध मापन विभागाकडून एप्रिल महिन्यांपासून विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. त्या अंतर्गत आतापर्यंत 886 दुकांनांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत वस्तू वजनात कमी देणे याबद्दल दोन खटले, तर इतर उल्लंघन केल्याप्रकरणी 78 असे एकूण 80 खटले दाखल करण्यात आले.

छापील किंमतीपेक्षा अधिक भावाने वस्तू विकल्याप्रकरणी मुंबईत एक खटला दाखल करण्यात आला. तसेच वैध मापन शास्त्राच्या व त्या अंतर्गत नियमावलीचे उल्लघन केल्याप्रकरणी राज्यभरात 77 खटले दाखल करण्यात आले. मुंबईत याबाबत सात खटले दाखल करण्यात आले. वैध मापन शास्त्र विभागाने केलेल्या कारवाईत सर्वाधीत म्हणजे 29 खटले नागपूरमध्ये दाखल झाले. तर औरंगाबाद विभागात मध्ये 21 खटले दाखल झाले. मुंबईतही सात खटले दाखल करण्यात आले. 

government  filed cases against 80 ration shop owners for giving lesser quantity

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com