सरकारकडून मासेमारीला परवानगी; मात्र, मासे विकणार कुठे?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 एप्रिल 2020

केंद्र सरकारने शनिवारी मासेमारीला परवानगी दिली आहे; पण पकडलेले मासे विकायचे कोठे, असा पेच आता उभा राहिला आहे. मुंबई महानगरपालिकेने अद्याप मासळी बाजार सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. राज्यभरातही अशीच परिस्थिती आहे.

मुंबई : केंद्र सरकारने शनिवारी मासेमारीला परवानगी दिली आहे; पण पकडलेले मासे विकायचे कोठे, असा पेच आता उभा राहिला आहे. मुंबई महानगरपालिकेने अद्याप मासळी बाजार सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. राज्यभरातही अशीच परिस्थिती आहे.

ही बातमी वाचली का? लॉकडाऊनमुळे मिरचीला कोरोनाचा ठसका

केंद्र सरकारने मासेमारीला परवानगी दिल्यानंतर अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री अस्लम शेख यांना पत्र लिहून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून मत्स्यविक्रीची परवानगी देण्याची मागणी केली आहे. त्यानुसार अस्लम शेख यांनी मंडयांमध्ये विक्रीची परवानगी दिली असल्याचा दावा तांडेल यांनी केला. मात्र, त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पकडलेले मासे विकण्याचा प्रश्न नाही तर त्याची वाहतूक करण्याचाही प्रश्न आहे, असे एका मासे विक्रेत्याने सांगितले.

ही बातमी वाचली का? एक हजार जणांना क्वारंटाईन केलं; कुटुंबांसहीत फिरतायेत रस्त्यावर

मुंबईत पालिकेचे 60 मासळी बाजार आहेत, तर 40 बाजार गावठाणे आणि कोळीवाड्यात आहेत. हे बाजार सुरू करण्याबाबत पालिकेनेही अद्याप निर्णय घेतलेला नाही. मुंबईत मासे उतरवण्याचे सात प्रमुख धक्के आहेत, तर 20 हून अधिक कोळीवाड्यांतील लहान-मोठी बंदरे आहेत. यावरून शेकडो टन मासे मुंबईत विक्रीसाठी येतात. मात्र, गेल्या 10 दिवसांपासून संपूर्ण व्यवसाय ठप्प पडला आहे.

ही बातमी वाचली का? धक्कादायक! मुंबईत संशयितांकडून आरोग्य यंत्रणेची दिशाभूल 

कोकणातील दैनंदिन मत्स्य उत्पादन 
1200 ते 1500 मेट्रिक टन 

मुंबईतील दैनंदिन मत्स्य उत्पादन 
400 ते 500 मेट्रिक टन 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: government Fishery permission; Where to sell? The question of fishermen