ब्रेकिंग - आयुर्वेदिक, होमियोपेथिक, युनानी, योग चिकित्सा पद्धतीबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय

ब्रेकिंग - आयुर्वेदिक, होमियोपेथिक, युनानी, योग चिकित्सा पद्धतीबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय

मुंबई - आयुष फॉर कोविड 19 टास्क फोर्स गठित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. याच्या अंतर्गत आयुर्वेदिक, होमियोपेथिक, युनानी, योग चिकित्सा पद्धतीचा वापर केला जाणार आहे. अलाक्षणिक आणि अल्प लाक्षणिक अश्या सर्व प्रकारच्या रूग्णांवर उपचार केले जाणार आहेत. गुजरात, पंजाब, मध्यप्रदेश, केरळ, गोवा इत्यादी राज्यात ही पद्धत यशस्वी झाली आहे. 

आयुष मंत्रालयाच्या सूचनेनंतर हा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. शासनाने आयूष मंत्रालयाला मान्यता दिलेली आहे. त्यानूसार, आयूष फॉर कोविड 19 टास्क फोर्स सुरु करण्यात येणार आहे. या टास्क फोर्सद्वारे शासनाच्या उपचार पद्धतीला मान्यता दिली जाणार आहे. 

9 जणांची टिम टास्क फोर्स मध्ये कार्यरत- 

या टास्क फोर्स मध्ये एकूण 9 जणांची टिम कार्यरत आहे. डॉ. तात्याराव लहाने हे या टिमच्या अध्यक्षपदी असणार आहेत. आयूषच्या या टास्क फोर्सला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. राज्यात कोविड 19 या संसर्गजन्य आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, जनतेची रोगप्रतिकारशक्ती वाढवणे त्याचप्रमाणे, कोविड 19 आजाराने ग्रस्त अलाक्षणिक तसेच अल्प लाक्षणिक रुग्णांवरील उपचारांसाठी आयुष अंतर्गत असलेल्या आयुर्वेद, होमियोपेथिक, युनानी, योग चिकित्सा या पध्दतीचा अवलंब करणे या साठी टास्क फोर्स ऑन आयुष फॉर कोविड 19 गठीत करण्यास शासनाची मान्यता मिळाली आहे.

government gave permission to form ayush for covid 19 task force read full report

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com