पनवेलमधील सरकारी कार्यालये पाण्यात

सकाळ वृत्‍तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

पनवेल  : शनिवारी आणि रविवारी झालेल्या पावसाचा फटका पनवेल शहरातील बंदर रोड परिसराला मोठ्या प्रमाणात बसला आहे. परिसरात शिरलेल्या पाण्यामुळे या भागात असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासह जुन्या न्यायालयाच्या इमारतीतही दोन ते तीन फूट उंचीपर्यंत घुसलेल्या पाण्यामुळे कार्यालयातील कागदपत्रांसह संगणकाचेही नुकसान झाल्याची माहिती देण्यात आली आहे. 

मुसळधार पावसामुळे गांधी नदीपात्रात पाण्याच्या पातळीत झालेल्या वाढीचा फटका पनवेल परिसराला मोठ्या प्रमाणात बसला. अनेक घरांना पाण्याचा फटका बसल्याने अग्निशमन दल आणि पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या मदतकार्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले; मात्र रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने सरकारी कार्यालयात कर्मचारी उपस्थित नसल्याने कार्यालयात ठेवण्यात येणारी महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित स्थळी हलविण्याकरिता  सरकारी विभागाला मोठ्या प्रमाणात फटका बसला. त्यामुळे अनेक योजनांची कागदपत्रे पाण्यामुळे खराब झाली असण्याची शक्‍यता आहे.

कार्यालयाच्या इमारतीत पाणी शिरल्याने अनेक महतत्वाची कागदपत्रे भिजली असण्याची शक्‍यता असून, संगणकही बंद असल्याचा परिणाम कामकाजावर होण्याची शक्‍यता आहे.
- व्ही. एन. भोये, अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government offices in Panvel in the water