esakal | यंदा IPL होणार प्रेक्षकांविना, सरकार घेणार का हा मोठा निर्णय ?
sakal

बोलून बातमी शोधा

यंदा IPL होणार प्रेक्षकांविना, सरकार घेणार का हा मोठा निर्णय ?

यंदा IPL होणार प्रेक्षकांविना, सरकार घेणार का हा मोठा निर्णय ?

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई -  बहुचर्चित इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल वेळापत्रकानुसार घेण्यासाठी अखेर ती प्रेक्षकांविना खेळवण्याचा विचार भारतीय क्रिकेट नियामक मंडळ गांभीर्याने करीत आहे. महाराष्ट्र तसेच कर्नाटक सरकारने आयपीएलच्या आपल्या राज्यातील लढतींना विरोध केल्यामुळे चाहत्यांविना लढतीचा प्रस्ताव समोर येत आहे. 

कोरोनाचा महाराष्ट्रात प्रसार होत असताना आयपीएलच्या मुंबईतील लढतींच्या तिकीटविक्रीस प्रतिबंध करण्याचा विचार राज्य सरकार करीत आहे. अर्थातच राज्य सरकारच्या आज झालेल्या बैठकीत आयपीएल लढतीसाठी प्रेक्षकांना प्रतिबंध करण्याबाबतच्या प्रस्तावावर विचार झाला आहे. त्यातच कर्नाटक सरकार बंगळूरुमधील आयपीएल सामने नकोत यासाठी तज्ज्ञांबरोबर चर्चा करीत आहे. त्याचबरोबर याबाबत केंद्र सरकारचे मत मागवले आहे. तमिळनाडूत आयपीएल लढतींच्या विरोधात जनहित याचिका सादर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आयपीएलच्या प्रशासकीय समितीची शनिवारी मुंबईत बैठक होत आहे. 

मोठी बातमी - 'कोरोना'संदर्भातील बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत, नागरिकांनी...

प्रशासकीय समितीचे सदस्य सध्या खासगीतही काहीही चर्चा करण्यास तयार नाहीत; मात्र परदेशातील अनेक महत्त्वाच्या लीग; तसेच स्पर्धा प्रेक्षकांविना होत आहेत. बंद दाराआड स्पर्धा घेऊन कोरोनाचा सामन्याच्या वेळी प्रसार होण्याचा धोका कमी केला जात आहे. त्यातच आयपीएलचे एकूण अर्थकारण लक्षात घेतले तर फ्रॅंचाईजच्या उत्पन्नात तिकीट विक्रीचा फारसा मोठा सहभाग नसतो. अर्थात लढतींचे वातावरण रिकामे स्टेडियम कसे करील, अशी विचारणा केली जात आहे. मात्र एका फ्रॅंचाईजच्या अधिकाऱ्यांनी स्पर्धा न होण्यापेक्षा रिकाम्या स्टॅंडमध्ये झालेली कधीही चांगली, अशीही टिप्पणी केली. मात्र फ्रॅंचाईजच्या मतास आयपीएल आयोजनाच्या अंतिम निर्णयात किती महत्त्व असेल, याबाबत काहींना शंकाच आहे. 

आयपीएलच्या लढती एकंदर नऊ राज्यात होणार आहेत. त्यापैकी महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारने आयपीएल लढतीच्या मंजुरीबाबत फेरविचार सुरू केल्याने प्रशासकीय समितीसमोरील आव्हान वाढले आहे. खेळाडूंचे आरोग्य महत्त्वाचे असताना स्पर्धेच्या व्यावसायिक गोष्टींचाही विचार करावा लागेल. त्यामुळेच प्रशासकीय समितीची बैठक महत्त्वाची आहे. ब्रिजेश पटेल यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीस मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली; तसेच सचिव जय शाह हेही उपस्थित राहणार आहे. 

मोठी बातमी - कोरोना आला मुंबईत ! मुंबईतील दोघांना कोरोनाची लागण...

जय शाह यांचे वडील अमित शाह देशाचे गृहमंत्री आहेत, त्यामुळे आयपीएलच्या आयोजनाबाबतचा तोडगा बैठकीपूर्वीच निघू शकेल, असेही काही क्रिकेट मंडळाच्या अभ्यासकांचे मत आहे. त्याच वेळी काही क्रिकेट अभ्यासक बुजुर्गांच्या क्रिकेट लीगमधील लढती मुंबई, नवी मुंबई; तसेच पुण्यात सुरू आहेत, मग त्यांना विरोध नाही आणि आयपीएललाच राज्य सरकारचा विरोध का, अशी विचारणा केली जात आहे. मात्र त्याच वेळी महाराष्ट्र तसेच कर्नाटकप्रमाणे अन्य राज्य सरकारही आयपीएलला विरोध करण्याची भूमिका घेऊ शकतात, असे मानले जात आहे. 

government is planning to conduct IPL 2020 without audience to avoid corona