

Gazetted Officers Hindi Language Exam
ESakal
मुंबई : राजपत्रित अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांच्या दहावीच्या शिक्षणात हिंदीचा विषय नाही, अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी राज्यात १९५१ पासून घेण्यात येत असलेली आणि यंदा २८ जूनला आयोजित करण्यात आलेल्या हिंदी भाषा निम्न श्रेणी व उच्च श्रेणी परीक्षेला सरकारने तूर्तास स्थगिती दिली आहे. या परीक्षेचे आयोजन राज्य भाषा संचालनालयातर्फे करण्यात आले होते.