माथाड़ी कायद्याच्या रक्षणार्थ हे सरकार घालावावे लागेल : आमदार भाई जगताप

दिनेश चिलप मराठे 
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

मुंबई : माथाड़ीं कामगारांच्या वार्षिक मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन करताना भाई जगताप म्हणाले की, माथाड़ी कायद्याच्या रक्षणार्थ हे युती सरकार घालवणे गरजेचे आहे. माथाडी कामगार नेते पोपटराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली अखिल महाराष्ट्र माथाड़ी कामगार युनियनचा मेळावा चिंचबंदर येथे पार पडला. यावेळी शेकडो कामगार त्यांच्या परिवारासहित उपस्थित होते. माथाड़ींच्या विविध प्रश्नांबाबत संघटनेचे पदाधिकारी आणि कामगारांनी आपले विचार मांडले. माथाड़ींचे प्रश्नसोडविण्यासाठी सर्वांनी एक जुटीने एकत्र येण्याची गरज असल्याचे जगताप यांनी प्रतिपादन केले.

कामगार नेते संपतराव शेवाळे यांनी संघटनेच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती देऊन कामगाराना लवकर घरे मिळावीत म्हणून सहकार्य करण्यात येईल असे सांगितले. या प्रसंगी माथाड़ींच्या शैक्षणिक गुणवत्ताधारक 10 वी,12 वी व पदवीधारक विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. यूनियनचे पदाधिकारी प्रकाश पाटील, डीएसशिंदे, बबनराव चिंचोलकर, संभाजी कोळेकर, चंद्रकांत रामिष्टे यांनी सकाळच्या अवयवदान मोहिमेस अनुसरुन अवयव दानाचा संकल्प केला.

Web Title: Government should be able to protect the mathadi workers law said MLA Bhai Jagtap