esakal | मार्गदर्शक तत्वाप्रमाणे सरकारने एखादा प्रायोगिक नाट्यप्रयोग करून दाखवावा; नाट्यपरिषेदचे आक्षेप
sakal

बोलून बातमी शोधा

मार्गदर्शक तत्वाप्रमाणे सरकारने एखादा प्रायोगिक नाट्यप्रयोग करून दाखवावा; नाट्यपरिषेदचे आक्षेप

लॉक़डॉऊनच्या काळात नाट्य व्यवसायाचे मोठे नुकसान झाले आहे. या व्यवसायावर 25 हजारापेक्षा अधिक लोक अवलंबून आहे. या व्यवसायाचे 75 टक्के नुकसान झाले आहे.

मार्गदर्शक तत्वाप्रमाणे सरकारने एखादा प्रायोगिक नाट्यप्रयोग करून दाखवावा; नाट्यपरिषेदचे आक्षेप

sakal_logo
By
तुषार सोनवणे

मुंबई -  लॉक़डॉऊनच्या काळात नाट्य व्यवसायाचे मोठे नुकसान झाले आहे. या व्यवसायावर 25 हजारापेक्षा अधिक लोक अवलंबून आहे. या व्यवसायाचे 75 टक्के नुकसान झाले आहे. यामुळे व्यवसाययिक, प्रायोगिक, हौशी आणि बाल अशा सर्व प्रकारच्या नाटकांसाठी येत्या 2021 या वर्षात नाट्यगृहाचे भाडे कमी करण्याची मागणी राज्य सरकारकडे करणार असल्याचे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा -  "राज्यातील तीन पक्षाच्या सरकारच्या मुस्काटात आज सणसणीत बसली" - राम कदम

लॉकडाऊनमुळे नाट्य क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे या क्षेत्रातील लोकांना मोठ्या आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. या व्यवसायाला सरकारने मदत करावी अशी अपेक्षा परिषदेकडून व्यक्त करण्यात आली आहे. माटुंग्याच्या यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलात नुकतीच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पत्रकार परिषद पार पडली. जानेवारी ते डिसेंबर 2021  या कालावधीसाठी व्यवसायिक नाटकांसाठी नाट्यगृहांचे भाडे 5 हजार रुपय आणि प्रायोगिक, हौशी, बाल नाट्यांसाठी दोन हजार रुपये भाडे असावे अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली.

बिहारमध्ये भाजपने शब्द पाळला, महाराष्ट्रात शिवसेनेला शब्द दिलाच नव्हता; प्रवीण दरेकरांची प्रतिक्रीया

नाट्य क्षेत्राला पुन्हा उभे करण्यासाठी 2021 वर्षात नाट्यगृहांची वीजबिले आणि मालमत्ता कर माफ करावेत, रंगमंच  कामगार, तंत्रज्ञ आदींना रेल्वे प्रवासाची मुभा द्यावी तसेच मदत म्हणून 10 कोटी रुपयांचा निधी द्यावा आणि अनुदानाचा कक्षा व्यापक करावी अशा मागण्या परिषदेकडून मांडण्यात आल्या आहेत.

नाट्यगृहे खुली करण्याची परवानगी सरकारने दिली आहे. परंतु त्या सर्व मार्गदर्शक तत्वांवर परिषदेने काही आक्षेप नोंदवले आहे. या तत्वांच्या आधारे नाट्यप्रयोग शक्य आहेत का? असतील तर सरकारने एखादा नाट्यप्रयोग प्रायोगिक तत्वावर करुन दाखवावा. असेही परिषदेने म्हटले आहे.

मार्गदर्शक तत्त्वांबाबत आक्षेप..

1. प्रसाधनगृहांसारख्या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी दीर्घकाळाचे मध्यंतर ठेवावे, म्हणजे नेमके किती काळाचे?

2. 50 टक्के प्रेक्षक बसवल्यास उरलेल्या 50 टक्के नुकसानाची भरपाई कोण देणार?

3. एखाद्या कलाकाराची ऑक्सिजन पातळी ऑक्सिमीटरमध्ये थोडीफार कमी दिसली तर आयत्या वेळी प्रयोग रद्द करावा लागेल. त्याचे नुकसान कोण सोसणार?

4. अंतर ठेवून बसवल्यानंतरही नाटक सुरू झाल्यावर प्रेक्षक नियम पाळतात का, यावर नियंत्रण कसे ठेवणार?

5. नियम न पाळल्यास संबंधितांवर म्हणजे नेमकी कोणावर कारवाई होणार?

6. निर्जंतुकीकरण, रंगभूषाकारांना पीपीई किट आदींचा खर्च नाट्यगृह व्यवस्थापनाने उचलावा की निर्मात्याने?

loading image