पनवेल : रेशनकार्डधारकांना ई-केवायसी करण्यासाठी ३१ मे ची डेडलाइन देण्यात आली होती व ती आता संपली आहे. मुदत संपूनही पनवेल तालुक्यात अद्याप एक लाख तीन हजार ५५५ लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया केलेली नाही. त्यामुळे या सर्वांचे रेशन धान्य कमी होण्याची शक्यता असल्याने सर्व पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.